शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
4
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
5
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
6
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
7
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
8
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
9
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
10
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
11
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
12
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
13
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
14
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
15
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
16
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
17
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
18
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
19
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
20
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
Daily Top 2Weekly Top 5

साडूभाऊंच्या हाती कोणाचे 'घड्याळ'? जावई टोपे, तनपुरेंच्या भूमिकेकडे धाराशिवचे लक्ष

By चेतनकुमार धनुरे | Updated: July 5, 2023 11:53 IST

प्राजक्त तनपुरे यांच्या अर्धांगिनी सोनालीताईंनी समाजमाध्यमांवर खा. शरद पवार यांना पाठिंबा दर्शविणारा एक व्हिडीओ पोस्ट केला आहे.

धाराशिव : धाराशिव ही राष्ट्रवादीतील तीन दिग्गज नेत्यांची सासुरवाडी आहे. एका जावयाने वेगळी चूल मांडून उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. आता उरलेले दोन जावई काय भूमिका घेतात, आपल्या राजकीय गुरूंच्या आश्रयालाच राहतात की साडूभाऊंना टाळी देतात, याकडे धाराशिव जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

विद्यमान उपमुख्यमंत्री अजित पवार, माजी आरोग्यमंत्री राजेश टोपे व माजी ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील तीन दिग्गज नेते. या सर्वांचीच सासुरवाडी धाराशिव जिल्ह्यातील आहे. अजित पवार यांची सासुरवाडी तेर असून, ते माजीमंत्री व राष्ट्रवादीचे संस्थापक सदस्य राहिलेल्या डॉ. पद्मसिंह पाटील यांच्या भगिनी सुनेत्राताईंचे मिस्टर. तर राजेश टोपे यांची सासुरवाडी उपळा. तेरपासून जवळच असलेल्या या उपळ्यातील पडवळ कुटुंबाचे ते जावई. प्राजक्त तनपुरे हे ढोकीतील देशमुख कुटुंबाचे जावई आहेत. तिघांचीही सासुरवाडी अवघ्या १५ किमीच्या परिघातील. त्यामुळे धाराशिवकरांसाठी तरी एकार्थाने हे तिघेही साडूभाऊच. आता यातील अजितदादांनी त्यांचे काका तथा राजकीय गुरू खा. शरद पवार यांची साथ सोडत भाजप-सेनेसोबत हातमिळवणी केली; मात्र त्यांचे साडूभाऊ राजेश टोपे व प्राजक्त तनपुरे यांनी मात्र अजूनही आपले पत्ते ओपन केले नाहीत. ते साडूभाऊंची साथ देतात की खा. शरद पवार यांच्यासोबत राहतात, याकडे सासुरवाडीचे लक्ष लागले आहे.

दरम्यान, प्राजक्त तनपुरे यांच्या अर्धांगिनी सोनालीताईंनी समाजमाध्यमांवर खा. शरद पवार यांना पाठिंबा दर्शविणारा एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. पाठोपाठ खा. अमोल कोल्हे यांनी शरद पवारांची बाजू घेतल्याने त्यांचे कौतुक केले. यातच मंगळवारी प्राजक्त तनपुरे यांनी अजितदादांची भेट घेतली; मात्र ती कशाबाबत घेतली, याविषयीच्या बातम्यांत तथ्य नसल्याचे सोनालीताईंनी जाहीर केले. यावरून तनपुरे कुटुंबाचा राजकीय कल लक्षात येत असला, तरी कालचा दिवस हा आज नसतो, हेही तितकेच खरे.

टॅग्स :Rajesh Topeराजेश टोपेPrajakta Tanpurayप्राजक्त तनपुरेOsmanabadउस्मानाबादNCPराष्ट्रवादी काँग्रेस