उस्मानाबाद : कळंब तालुक्यातील भाटशिरपुरा ग्रामस्थांनी पाणी फाऊंडेशन अंतर्गत जलसंवर्धनाचे उत्कृष्ट काम केले असून, यासाठी घेतलेल्या पुढाकाराचे व कष्टाचे कौतुक करत भाटशिरपुरा हे आदर्श गाव करण्यासाठी पूर्ण ताकतीने ग्रामस्थांसोबत आहे, अशी ग्वाही आ. राणा जगजितसिंह पाटील यांनी दिली. भाटशिरपुरा येथे श्रीकृष्ण मंदिरासमोरील सभागृह बांधकामाच्या भूमिपूजनप्रसंगी ते बोलत होते. ग्रामीण अर्थव्यवस्था बळकट करण्यासाठी शेतकऱ्यांच्या घरात पैसे येणे आवश्यक असून, यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ग्रामीण भागातील शेतकरी, मजूर, छोटे व्यावसायिक व कामगारांसाठी विविध योजना सुरू केल्या आहेत. यामध्ये शेतकरी सन्मान योजनेचा आवर्जून उल्लेख करत प्रधानमंत्री स्वनिधी योजना, ई-मुद्रा, किसान क्रेडिट कार्ड, आत्मनिर्भर भारत योजने अंतर्गत केंद्र शासनाकडून देण्यात येत असलेल्या अर्थसहाय्य व सवलतीचा उल्लेख केला. खरीप २०२० मधील पीकविम्याबाबत राज्य सरकार गंभीर नसून, शेतकऱ्यांना त्यांचा न्याय हक्क मिळवून देण्यासाठी आपला न्यायालयीन लढा सुरु आहे. यात नक्कीच यश मिळेल, असा विश्वास व्यक्त केला.
यावेळी जि. प. अध्यक्षा अस्मिताताई कांबळे, बाजार समिती सभापती रामहरी शिंदे, बांधकाम सभापती दत्तात्रय देवळकर, तालुकाध्यक्ष अजित पिंगळे, संजय पाटील, पंडितराव टेकाळे, सुरेश कोरे, अनिल टेकाळे, उत्तम टेकाळे, दत्तात्रय साळुंके, भागचंद बागरेचा, अरुण चौधरी, बजरंग शिंदे, आर. के कोल्हे, प्रणव चव्हाण, नागनाथ घुले, शिवाजीराव गिड्डे, संजय अडसूळ, सरपंच सुनीता वाघमारे, उपसरपंच मेजर सूर्यकांत खापे, शिवराज गायकवाड, रामचंद्र खापे, उमेश रितपुरे, चेअरमन अंकुश गायकवाड, दिलीप वाघमारे, अशोक गायकवाड, रमेश रितपुरे, जनक गायकवाड, विजय गायकवाड, श्रीहरी रितपुरे, अशोक खापे, रामराव पाटील आदी उपस्थित होते.