शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

लुटारूंना विरोध केल्याने वॉचमनचा गोळी घालून खून 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 8, 2021 19:41 IST

Crime News कळंब येथील मार्केट यार्ड भागातील अजय साहेबराव जाधव यांच्या अडत दुकानात खुनाची घटना शनिवारी पहाटे घडली होती.

उस्मानाबाद : अंमली पदार्थांचे सेवन करुन लुटीच्या उद्देशाने शिरलेल्या आरोपींना विराेध केल्यानेच त्यांनी कळंब येथील वॉचमनचा गोळी घालून खून केल्याचे निष्पन्न झाले आहे. अवघ्या चोवीस तासात गजाआड केल्यानंतर आरोपींनी कोठडीत गुन्ह्याची कबुली देताना खुनाचा उद्देश सांगितला. 

कळंब येथील मार्केट यार्ड भागातील अजय साहेबराव जाधव यांच्या अडत दुकानात खुनाची घटना शनिवारी पहाटे घडली होती. येथे वॉचमन म्हणून कार्यरत असलेले मच्छिंद्र छगन माने हे शनिवारी पहाटे पहारा देत असताना त्यांच्याशी झटापट करुन छातीत गोळी झाडून त्यांचा खून झाल्याचा प्रकार शनिवारी सकाळी उघडकीस आला. दरम्यान, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक गजानन घाडगे यांच्या पथकाने चोवीस तासांच्या आत याप्रकरणातील आरोपींचा छडा लावला. त्यांनी आरोपी शाम उर्फ बाॅयलर राजाभाऊ पवार (रा.केज, जि.बीड) व गणेश सुब्राव पवार (रा.कल्पनानगर, कळंब) या दोन आरोपींना रविवारी गजाआड केले. पोलीस कोठडीत असलेल्या आरोपींची चौकशी केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली आहे. दुकानातील रोकड लुटण्याच्या उद्देशानेच त्यांनी हे कृत्य केल्याचे कबूल केले आहे. त्यामुळे या खून प्रकरणाचे गूढ उकलण्यात अखेर पोलिसांना यश आले आहे.

आरोपींनी केली होती पार्टी...गुन्हा घडवून आणण्यापूर्वी आरोपींनी मार्केट यार्डालगतच पार्टी केली होती. त्यात मद्य व गांजाचे सेवन करण्यात आले होते. एकूण ११ जणांनी हा लुटीचा प्लॅन आखला होता. यातील काही जण हे यार्डातच हमाली काम करीत होते. त्यांनी दुकानात शिरुन रोकड लुटण्याचा बेत इतरांना सांगितला. यातील एकाकडे गावठी बंदूक होती. हे सर्वजण कंपाऊंडमधून आत शिरल्यानंतर वॉचमन माने यांनी त्यांना हटकले होते. यातून आरोपी व माने यांची झटापट झाली. यातच बंदूकधारी आरोपीने गोळी झाडली. घटनेनंतर हे सर्व जण तेथून पसार झाले. पोलीस गोळी झाडणाऱ्यांसह ९ आरोपींचा शोध घेत आहेत.

टॅग्स :Deathमृत्यूCrime Newsगुन्हेगारीOsmanabadउस्मानाबाद