ग्रामविकास अधिकारी निलंबित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2021 04:22 AM2021-07-21T04:22:44+5:302021-07-21T04:22:44+5:30

कळंब : तालुक्यातील हावरगाव येथील ग्रामसेवक लाचलुचपत विभागाच्या सापळ्यात अडकून चोवीस तास होतात न होतात, तोच ऐन पावसाळ्यात निवासी ...

Village Development Officer suspended | ग्रामविकास अधिकारी निलंबित

ग्रामविकास अधिकारी निलंबित

googlenewsNext

कळंब : तालुक्यातील हावरगाव येथील ग्रामसेवक लाचलुचपत विभागाच्या सापळ्यात अडकून चोवीस तास होतात न होतात, तोच ऐन पावसाळ्यात निवासी अतिक्रमण काढल्याप्रकरणी तालुक्यातील खामसवाडी येथील ग्रामविकास अधिकाऱ्यावर निलंबनाची कुऱ्हाड कोसळली आहे.

तालुक्यातील लोकसंख्या व आकाराने मोठ्या असलेल्या खामसवाडी गावात सध्या एका शासकीय जागेतील निवासी अतिक्रमणाचा विषय चांगलाच चर्चेला आला आहे. या ठिकाणची अतिक्रमणे मंगळवारी हटविण्यात आली होती. यानंतर, सदर जागेत वास्तव्य करणाऱ्या कुटुंबातून तीव्र संताप व्यक्त केला जात होता. या संदर्भात शिष्टमंडळाने प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांची भेट घेऊन कारवाई करण्याची मागणी केली होती. याविषयी विस्तार अधिकारी यांनी १६ जुलै रोजी चौकशी अहवालही सादर केला होता. दरम्यान, ऐन पावसाळ्यात निवासी अतिक्रमण काढल्याप्रकरणी व या संदर्भात कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी ग्रामविकास अधिकारी डी.एस. पटणे यांच्यावर कर्तव्यात कसूर केल्याचा ठपका ठेवत निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. कळंब येथील गटविकास अधिकारी एन.पी. राजगुरू यांनीही कारवाई केली आहे.

चौकट...

शासन परिपत्रक बेदखल केले म्हणून...

महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वनविभागाच्या १० फेब्रुवारी, २००१च्या शासन परिपत्रकानुसार कोणत्याही शासकीय, निमशासकीय व खासगी जागेमधील अनधिकृत बांधकाम १ जून ते ३० सप्टेंबर या कालावधीत तोडण्यात येऊ नये, असे आदेशित केले आहे. यासह महाराष्ट्र जि.प. जिल्हा सेवा वर्तणूक व शिस्त अधिनियमातील कलमाचा भंग केल्याने, शिस्त व अपिल अधिनियमातील तरतुदीनुसार कारवाई करण्यात आली आहे.

काल लाच, आज अतिक्रमण भोवले

वित्त आयोगाच्या कामात बदल करून, त्यास मंजुरी देण्यासाठी दस्तुरखुद्द गावच्या सरपंचाकडून दहा हजारांची लाच स्वीकारताना, हावरगाव येथील ग्रामसेवक सोमवारी सायंकाळी एसीबीच्या गळाला लागले होते. मंगळवारी खामसवाडी येथील ग्रामविकास अधिकारी डी.एस. पटणे यांना गावातील अतिक्रमण ऐन पावसाळ्यात काढल्याचा ठपका ठेवत निलंबित व्हावे लागले आहे.

Web Title: Village Development Officer suspended

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.