शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
3
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
4
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
5
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
6
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
7
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
8
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
9
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
10
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
11
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
12
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
13
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
14
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
15
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
16
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
17
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
18
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
19
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
20
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
Daily Top 2Weekly Top 5

Video : '...आली साहित्याची वारी'; ९३ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे थीम सॉंग ऐकले का ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 1, 2020 19:00 IST

१० ते १२ जानेवारीदरम्यान फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांच्या अध्यक्षतेखाली साहित्य संमेलन होत असून, ज्येष्ठ कवी ना.धों. महानोर संमेलनाचे उद्घाटक आहेत

उस्मानाबाद : ९३ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या प्रचार, प्रसाराच्या अनुषंगाने पहिल्यांदाच थीम सॉंगचा प्रयोग करण्यात आला असून, बुधवारी जिल्हाधिकारी दीपा मुधोळ मुंडे यांच्या हस्ते हे गीत राज्यातील १२ जिल्ह्यात एकाचवेळी येथील आकाशवाणी केंद्रातून प्रसृत करण्यात आले.

१० ते १२ जानेवारीदरम्यान फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांच्या अध्यक्षतेखाली साहित्य संमेलन होत असून, ज्येष्ठ कवी ना.धों. महानोर संमेलनाचे उद्घाटक आहेत, तसेच ज्येष्ठ साहित्यिक रा.रं. बोराडे यांनाही प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रित करण्यात आले आहे. साहित्य संमेलनाच्या आयोजन स्थळाला ‘संत गोरोबा काका साहित्यनगरी’ असे नाव देण्यात आले असून, शाहीर अमर शेख साहित्य मंच, सेतू माधवराव पगडी साहित्य मंच व दत्तोअप्पाजी तुळजापूरकर साहित्य मंच, असे तीन भव्य मंडप उभारण्यात आले आहेत. 

असे आहे संमेलनाचे वेळापत्रक : १० रोजी स. ९ वा. तुळजाभवानी क्रीडा संकु ल येथून ग्रंथदिंडी निघून संमेलनाची सुरुवात होईल. स. ११ वा. ठाले पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण होईल. यानंतर मावळत्या अध्यक्षा डॉ. अरुणा ढेरे यांच्या हस्ते ग्रंथप्रदर्शनाचे उद्घाटन होईल. दु. ३.३० वा. तुळजापूर येथील कलावंत पारंपरिक गोंधळ सादर करणार असून, सायं. ४ ते ७ या वेळेत शाहीर अमर शेख साहित्य मंचावर संमेलनाचा उद्घाटन सोहळा  रंगेल. सायं. ७.३० ते रात्री १०.३० या वेळेत मुंबई येथील कवयित्री नीरजा यांच्या अध्यक्षतेखाली निमंत्रितांचे कविसंमेलन, तर दत्तोअप्पाजी तुळजापूरकर मंडपात इंद्रजित भालेराव यांच्या हस्ते कविकट्ट्याचे उद्घाटन होईल.

दि.११ रोजी शाहीर अमर शेख साहित्य मंचावर स. ९.३० वा. डॉ. दासू वैद्य आणि सारंग दर्शने लेखिका प्रतिभा रानडे यांची प्रकट मुलाखत घेतील. स. ११ वा. डॉ. सुषमा करोगल यांच्या अध्यक्षतेखाली ‘आजचे भरमसाठ कवितालेखन : बाळसं की सूज’ या विषयावर परिसंवाद होईल. दु. २ वा. सतीश तराळ यांच्या अध्यक्षतेखाली कथाकथन होईल.  याच दिवशी सेतू माधवराव पगडी साहित्य मंचावर स. ९.३० वा. शालेय विद्यार्थी सांस्कृतिक कार्यक्रम सादर करतील. स. ११ वा. प्रा. बाळकृष्ण कवठेकर यांच्या अध्यक्षतेखाली ‘अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्यातील जीवन जाणिवा’ या विषयावर, तर दु. २ वा. श्रीराम शिधये यांच्या अध्यक्षतेखाली ‘एकविसाव्या शतकात लिहिल्या गेलेल्या मराठी साहित्यात वाचण्यासारखे काय आहे?’ या विषयावर, सायं. ५ वा. ‘संत साहित्याचे सामाजिक दृष्टीने पुरेसे आकलन न झाल्यामुळे समाजात बुवाबाजी प्रस्थ वाढते आहे’ या विषयावर ह.भ.प. राम महाराज राऊत यांच्या अध्यक्षतेखाली परिसंवाद होईल.

दि.१२ रोजी स. ९.३० ते १२ वा. शाहीर अमर शेख साहित्य मंचावर 'संवाद : आजच्या लक्षवेधी कथालेखकांशी', दु. २ ते ४ परिचर्चा : शेतकऱ्याचा आसूड : महात्मा फुले, याच दिवशी सेतू माधवराव पगडी साहित्य मंचावर परिसंवाद : आजचे सामाजिक वास्तव आणि मराठी लेखक, दु. निमंत्रितांचे कविसंमेलन व दु. २ ते ५.३० वाजे दरम्यान बालकुमार मेळावा होईल. समारोप सेतू माधवराव पगडी साहित्य मंचावर सायं ५  ते ७ या वेळेत समारोप होईल. 

काही नवीन उपक्रम होणारबालाजी सुतार यांच्या वतीने सादर केला जाणारा ‘गावकथा’चा प्रयोग, म. फुले यांच्या ‘शेतकऱ्यांचा असूड’ या ग्रंथावर अभ्यासकांची परिचर्चा आणि पाच लक्षवेधी कथाकरांशी अरविंद जगताप आणि राम जगताप यांचा प्रकट संवाद हे नवीन उपक्रम या संमेलनात होणार आहेत.

टॅग्स :akhil bharatiya marathi sahitya mahamandalअखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळMarathi Sahitya Sammelanमराठी साहित्य संमेलनliteratureसाहित्य