उमरग्यात विविध धार्मिक कार्यक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 22, 2021 04:20 AM2021-02-22T04:20:46+5:302021-02-22T04:20:46+5:30

उमरगा : येथील श्री संत सेना महाराज- विठ्ठल रुक्मिणी मंदिराच्या तिसऱ्या वर्धापन दिनानिमित्त दोन दिवस विविध धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रम ...

Various religious programs in the age group | उमरग्यात विविध धार्मिक कार्यक्रम

उमरग्यात विविध धार्मिक कार्यक्रम

googlenewsNext

उमरगा : येथील श्री संत सेना महाराज- विठ्ठल रुक्मिणी मंदिराच्या तिसऱ्या वर्धापन दिनानिमित्त दोन दिवस विविध धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रम पार पडले. यानिमित्त गुरुवारी ह.भ.प. मनोहर महाराज माने (वाकसा, ता.निलंगा) यांची कीर्तनसेवा झाली. यावेळी ह.भ.प. गर्जे महाराज (माळेगाव), माउली महाराज शिंदे, वीरनाथ महाराज काळे (उमरगा), दुधाराम क्षीरसागर यांच्यासह महादेव भजनी मंडळ उपस्थित होते. शुक्रवारी मंदिरात भजनाचा कार्यक्रम झाला. दुपारी बारा वाजता श्रीची महाआरती झाल्यानंतर भाविकांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. यावेळी श्री संतसेना महाराज मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष अविनाश काळे, सचिव जगदीश सुरवसे, प्रा.डॉ.संजय अस्वले, प्रा.जी.जी. काळे, केशवराव काळे, दुधाराम क्षीरसागर, बालाजी काळे, नाभिक संघटनेचे तालुकाध्यक्ष गुरुनाथ विभुते, शहराध्यक्ष नागेश सोमवंशी, विठ्ठल जवळगेकर, पिंटू काळे, प्रल्हाद कारागीर, सतिश काळे, वनराज सूर्यवंशी, संतोष काळे, आकाश काळे, सिद्धाराम चौधरी, भास्कर मुळे, गणेश काळे, शिवाजी मुळे, श्याम काळे, नीलेश काळे, प्रताप मुळे, शिवाजी सुरवसे, पिंटू मुलगे आदींनी कार्यक्रमासाठी पुढाकार घेतला. यावेळी मंदिर समिती व नाभिक संघटनेच्या वतीने रोटरी क्लबच्या अध्यक्षा कविता अस्वले यांचा सत्कार करण्यात आला.

फोटो- उमरगा येथील श्री संत सेना-विठ्ठल रुक्मिणी महाराज मंदिरात मूर्तीचे विधिवत पूजन करण्यात आले. यावेळी प्रा.डॉ.संजय अस्वले, वीरनाथ काळे महाराज, गुरुनाथ विभुते, केशवराव काळे, नागेश सोमवंशी, प्रा.जी.जी. काळे, जगदीश सुरवसे आदी.

Web Title: Various religious programs in the age group

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.