डोकेवाडी येथील ग्रामदैवत वेताळ स्वामी यांची दरवर्षी आषाढ महिन्यात वार्षिक यात्रा असते; परंतु मागील वर्षापासून कोरोनामुळे यात्रेवर निर्बंध आले आहेत. त्यामुळे ग्रामपंचायतीच्यावतीने शुक्रवारी रक्तदान शिबिर घेण्यात आले. यासाठी सोलापूर येथील सिद्धेश्वर रक्तपेढीचे सहकार्य लाभले. याचे उद्घाटन ठाणे मनपाचे माजी नगरसेवक आत्माराम थोरात यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी उद्योजक बाळासाहेब खरवडे, शिवसेनेचे केशव चव्हाण, सरपंच सुषमा थोरात, उपसरपंच अजित पवार, भीमराव माने, रवींद्र पवार, भास्कर जालन, राजेंद्र आहेर, सुरेश खैरे, पिंटू रोटे, रघुनाथ आहेर, ग्रामसेवक दीपक गोरे आदी उपस्थित होते. या शिबिरामध्ये ५६ जणांनी रक्तदान केले. तसेच येथील जिल्हा परिषद शाळेच्या आवारात १०० रोपांची वृक्ष लागवड करण्यात आली. यासाठी मुख्याध्यापक निकम व शिक्षकांनी सहकार्य केले.
वेताळ स्वामी यात्रेनिमित्त विविध कार्यक्रम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2021 04:30 IST