शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
6
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
7
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
8
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
9
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
10
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
11
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
12
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
13
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
14
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
15
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
16
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
17
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
18
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
19
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
20
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
Daily Top 2Weekly Top 5

Valentine Day : डॉक्टर दाम्पत्याची व्यसनमुक्ती मोहीम !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2019 13:19 IST

डॉ. संदीप माणिकराव तांबारे व डॉ. पल्लवी संदीप तांबारे हे मूळचे आंदोरा (ता. कळंब) येथील दाम्पत्य़ वैद्यकीय व्यवसायासाठी २००८ मध्ये येरमाळा येथे स्थिरावले.

- बालाजी अडसूळ 

कळंब (जि़उस्मानाबाद)  : व्यसनामुळे केवळ एक व्यक्ती नव्हे तर त्याच्या तीन पिढ्यांची बरबादी होते, हे वैद्यकीय सेवा करताना लक्षात आलेल्या तांबारे डॉक्टर दाम्पत्याने व्यसनमुक्तीच्या कार्याला वाहून घेतले़ गेली नऊ वर्षे त्यांनी अविरत परिश्रम घेऊन तब्बल १८ हजारांवर व्यक्तींची व्यसनातून सुटका करतानाच त्यांच्या कुटुंबियांच्या चेहऱ्यावरही हास्य फुलविण्याचे कार्य केले आहे़ 

डॉ. संदीप माणिकराव तांबारे व डॉ. पल्लवी संदीप तांबारे हे मूळचे आंदोरा (ता. कळंब) येथील दाम्पत्य़ वैद्यकीय व्यवसायासाठी २००८ मध्ये येरमाळा येथे स्थिरावले. वैद्यकीय क्षेत्रात नावलौकिक मिळवितानाच त्यांना आपल्याकडे आलेले बहुतांश रूग्ण व्यसनाच्या आहारी गेले असल्याचे व त्यांच्या आजाराचे मूळ हे व्यसनात दडल्याचे डॉ. तांबारे यांच्या निदर्शनास आले. यामुळे समाजभान जागृत असलेल्या तांबारे दाम्पत्याने व्यसनमुक्तीच्या कार्यात झोकून देण्याचा निर्णय सुमारे नऊ वर्षांपूर्वी घेतला़ येरमाळा येथेच त्यांनी व्यसनमुक्तीसंदर्भात संशोधन सुरु केले़ यातून पुढे आलेल्या उपचारपद्धतींचा अवलंब करुन डॉ़संदीप व डॉ़पल्लवी यांनी मोठी झेप घेतली़ 

व्यसनी व्यक्तीवर मानसोपचार, योगोपचार, औषधोपचार, समुपदेशन, संगीतोपचार या सर्व बहुसूत्री उपचार पद्धतीचा अवलंब करून व्यसनमुक्तीचा धडा हे दाम्पत्य देत आले आहे़ इतक्यावरच न थांबता या व्यक्ती पुन्हा व्यसनाच्या आहारी जाऊ नये, यासाठी त्यांच्या पुनर्वसनाचे व्रतही त्यांनी हाती घेतले़ आजवर १८ हजारांवर व्यक्तींची व्यसनमुक्ती केल्यानंतर त्यातील ९६८ जणांचे पुनर्वसन केले आहे़ या दाम्पत्याचे हे कार्य राज्यभर व्यापले आहे़ 

व्यसनमुक्तीची दिंडीएखाद्या गावात व्यसनाधीनतेने कळस गाठल्याचे कळताच हे दोघेही व्यसनमुक्तीची दिंडी घेऊन तेथे हमखास पोहोचतात़ गृहभेटी देऊन जनजागृती साहित्य वाटप केले जाते़ प्रोजेक्टरद्वारे चित्रफिती दाखवून व्यसनापासून नागरिकांना परावृत्त करण्याचे कार्य केले जाते़ व्यसनामुळे नातेसंबंधांत निर्माण झालेला दुरावा दूर करण्याचे कार्यही त्यांनी केले आहे़ कौटुंबिक समुपदेशनाचा मार्ग वापरुन त्यांनी शेकडो कुटुंबांची संसारवेल पुन्हा फुलविली आहे़ 

टॅग्स :Valentine Dayव्हॅलेंटाईन्स डेdoctorडॉक्टरSocialसामाजिक