जिल्ह्यातील नऊ रुग्णालयांत घेता येईल काेराेना लस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 1, 2021 04:36 AM2021-03-01T04:36:25+5:302021-03-01T04:36:25+5:30

उस्मानाबाद : काेराेना लसीकरणाच्या दुसऱ्या टप्प्यात खासगी रुग्णालयांचाही सहभाग वाढविण्यात आला आहे. लस घेण्यासाठी पात्र असलेल्या व्यक्ती आता खासगी ...

The vaccine can be taken at nine hospitals in the district | जिल्ह्यातील नऊ रुग्णालयांत घेता येईल काेराेना लस

जिल्ह्यातील नऊ रुग्णालयांत घेता येईल काेराेना लस

googlenewsNext

उस्मानाबाद : काेराेना लसीकरणाच्या दुसऱ्या टप्प्यात खासगी रुग्णालयांचाही सहभाग वाढविण्यात आला आहे. लस घेण्यासाठी पात्र असलेल्या व्यक्ती आता खासगी रुग्णालयातूनही लस घेऊ शकतात. यासाठी शासनाने जिल्ह्यातील नऊ रुग्णालये निश्चित केली आहेत. यात उस्मानाबाद शहरातील सात तर उमरग्यातील दाेन रुग्णालयांचा समावेश आहे. एका डाेसचे शुल्क अडीचशे रुपये एवढे निश्चित केले आहे.

काेराेना लसीकरणाचा पहिला टप्पा १६ जानेवारीपासून सुरू झाला हाेता. आता दुसरा टप्पा १ मार्चपासून सुरू हाेत आहे. या टप्प्यात ६० वर्षांवरील ज्येष्ठ व्यक्ती व आजाराने त्रस्त असलेल्या ४५ वर्षांवरील नागरिक लस टाेचून घेऊ शकतात. नागरिकांना एका डाेससाठी अडीचशे रुपये आकारले जाणार आहेत. यात लसीची किंमत १५० तर उर्वरित शंभर रुपये सेवेसाठी घेण्यात येणार आहेत. सरकारी रुग्णालयांत मात्र लसीकरण माेफत राहणार आहे. या माध्यमातून लसीकरणाचे प्रमाण वाढण्यास मदत हाेणार आहे.

चाैकट..

या हाॅस्पिटलचा समावेश...

उस्मानाबाद शहरातील चिरायू हाॅस्पिटल ॲण्ड आयसीयू सेंटर, वात्सल्य हाॅस्पिटल, निरायम हाॅस्पिटल, सुविधा मल्टिस्पेशालिटी हाॅस्पिटल, सह्याद्री मल्टिस्पेशालिटी हाॅस्पिटल, शिवाई हाॅस्पिटल ॲण्ड क्रिटिकल केअर सेंटर, साई मल्टिस्पेशालिटी हाॅस्पिटल तर उमरगा शहरातील चिंचाेली हाॅस्पिटल आणि शेंडगे हाॅस्पिटल ॲण्ड रिसर्च सेंटर अशा नऊ खासगी दवाखान्यांतून काेराेना लस देण्यास सरकारने अनुमती दिली आहे. एका डाेससाठी अडीचशे रुपये आकारले जाणार आहेत.

लस घेण्यासाठी जाताना...

लाभार्थ्यांनी आधार कार्ड, निवडणूक आयाेगाचे ओळखपत्र किंवा सरकारने दिलेले ओळखपत्र साेबत नेणे आवश्यक आहे.

तसेच इतर आजार असलेल्या ४५ ते ५९ या वयाेगटातील नागरिकांसाठी डाॅक्टरांचे प्रमाणपत्र बंधनकारक आहे.

पूर्व नाेंदणी गरजेची...

इच्छुक लाभार्थ्यांना ‘काेविन २.०’ तसेच ‘आराेग्य सेतू’ या ॲपवर नाेंदणी करणे आवश्यक आहे. प्रत्यक्ष लसीकरण केंद्रामध्ये जाऊनही नाेंदणी करता येणार आहे.

Web Title: The vaccine can be taken at nine hospitals in the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.