साठा संपल्याने लसीकरण थांबले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 10, 2021 04:32 AM2021-04-10T04:32:06+5:302021-04-10T04:32:06+5:30

(फोटो : संतोष मगर ०९) तामलवाडी : तुळजापूर तालुक्यातील सावरगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात कोरोना लस घेण्यासाठी शुक्रवारी नागरिकांनी गर्दी ...

Vaccination stopped as stocks ran out | साठा संपल्याने लसीकरण थांबले

साठा संपल्याने लसीकरण थांबले

googlenewsNext

(फोटो : संतोष मगर ०९)

तामलवाडी : तुळजापूर तालुक्यातील सावरगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात कोरोना लस घेण्यासाठी शुक्रवारी नागरिकांनी गर्दी केली होती. परंतु, दुपारीच लसीचा साठा संपल्याने प्रशासनाला लसीकरण बंद करावे लागले.

कोराेना लसीची टंचाई भासणार या अफवेने ग्रामीण भागातील नागरिकांनी शुक्रवारी लस घेण्यासाठी सकाळपासून गर्दी केली होती. ऑनलाईन नोंदणीसाठी रांगा लागल्या होत्या. त्यात ज्येष्ठांचा मोठा सहभाग होता. दुपारपर्यंत १६० जणांना लस टोचण्यात आली. परंतु, यानंतर लसीचा साठा संपल्याने दुपारी १ नंतर लसीकरणाचे काम बंद पडले. यानंतर तहसीलदार सौदागर तांदळे यांच्या आदेशानुसार लोहारा ग्रामीण रुग्णालयातून लसीचे डोस आणण्यासाठी रूग्णवाहिका रवाना करण्यात आली. लसीकरण मोहिमेसाठी डॉ. स्नेहा मोटे, डॉ. स्नेहल क्षीरसागर, औषध निर्माता संदीप जगताप, आरोग्य सेविका संगीता चव्हाण, शोभा आदलिंगे, भालशंकर, संजय रूपनर परिश्रम घेत आहेत . दरम्यान, सावरगाव येथून पन्नास डोस प्राप्त झाल्याने एक दिवसाचा प्रश्न मिटला आहे.

१५ नवीन रुग्ण

आरोग्य विभागाकडून लसीकरण कार्यक्रम प्रभावीपणे राबविला जात असताना गुरूवारी जळकोटवाडीत ४, मांळुब्रा येथे ४ आणि काटी येथे ७ अशा एकूण १५ बाधित रुग्णांची भर पडली. त्यामुळे ग्रामीण भागात चिंता वाढली आहे. एकीकडे लसीचा तुटवडा निर्माण होत असतानाच दुसरीकडे बाधितांची संख्या वाढू लागली आहे. विशेषत: गंजेवाडी, जळकोटवाडी, काटी, मांळुब्रा या गावात रुग्ण वाढत असल्याचे चित्र आहे.

Web Title: Vaccination stopped as stocks ran out

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.