शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
4
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
7
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
8
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
9
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
10
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
11
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
12
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
13
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
14
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
15
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
16
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
17
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
18
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
19
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
20
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
Daily Top 2Weekly Top 5

धाराशिवमध्ये उद्धवसेनेचा राष्ट्रवादीवर आरोप, 'भाजपच्या हितासाठी स्वबळाची भूमिका'

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 26, 2025 16:25 IST

आघाडीवरून राष्ट्रवादी-उद्धवसेनेत जुंपली; उद्धवसेना-काँग्रेस वगळता इतर कोणत्याही पक्षांची आपसात दिलजमाई झाली नाही. त्यामुळे दोन्ही राष्ट्रवादी, भाजप, शिंदेसेना स्वबळ आजमावत आहेत.

धाराशिव : धाराशिव नगरपरिषदेची निवडणूक आता रंगात येऊ लागली आहे. उद्धवसेनेच्या उमेदवारांचा प्रचाराचा नारळ सोमवारी फुटला. यावेळी शरद पवारांच्या राष्ट्रवादीवर भाजपच्या सांगण्यावरून आघाडी तोडल्याचा दावा खासदार ओम राजेनिंबाळकर यांनी केला. त्यास राष्ट्रवादीनेही आपल्याकडे मेरिट असतानाही सन्मान राखला जात नव्हता, आता राजकारण बस करा, विकासावर बोला, असे प्रत्युत्तर देत ठिणगी टाकली.

धाराशिव नगरपरिषदेच्या अध्यक्ष व ४१ नगरसेवक पदांसाठी निवडणूक होत आहे. अर्ज मागे घेण्याच्या अंतिम दिवसापर्यंत युती-आघाडीसाठी पक्षांमध्ये प्रयत्न सुरू होते. मात्र, उद्धवसेना-काँग्रेस वगळता इतर कोणत्याही पक्षांची आपसात दिलजमाई झाली नाही. त्यामुळे दोन्ही राष्ट्रवादी, भाजप, शिंदेसेना स्वबळ आजमावत आहेत. दरम्यान, महाविकास आघाडीत केवळ शरद पवारांची राष्ट्रवादी सहभागी झाली नाही. यावरून उद्धवसेनेने त्यांच्या पदाधिकाऱ्यांवर निशाणा साधला. केवळ मतविभागणीसाठी भाजपच्या इशाऱ्यावर ही चाल चालली जात असल्याचे सांगत दोघांचाही हिशोब जनता मतदानातून करेल, असा दावा केला. यावर राष्ट्रवादीनेही जागावाटपाच्या तीन बैठका होऊनही पक्षाला सन्मानजनक जागा मिळत नसल्याने वेगळे लढण्याची भूमिका पक्षश्रेष्ठींच्या मान्यतेने घेतल्याचे म्हटले. राजकारण सोडून विकासावर बोलण्याचे आव्हानही त्यांनी उद्धवसेनेस दिले आहे.

जनता हिशोब करेलअडीच वर्षे उपनगराध्यक्ष, काही काळ नगराध्यक्षपद व स्वीकृत नगरसेवकांच्या जागा राष्ट्रवादीला देण्याची भूमिका आम्ही मांडली होती. सर्व व्यवस्थित सुरू असताना कोणाच्या (भाजप) सांगण्यावरून ही भूमिका घेतली, हे वेगळं सांगण्याची गरज नाही. जनता दोघांचाही २ नोव्हेंबरला हिशोब करेल.-ओम राजेनिंबाळकर, खासदार, उद्धवसेना.

कमी जागा दिल्याआमच्याकडे मेरिटचा नगराध्यक्ष पदाचा उमेदवार असतानाही वाटाघाटीत हे पद उद्धवसेनेला सोडून दिले. त्याबदल्यात आम्ही अगदी शेवटच्या क्षणी ८ जागा मागितल्या. मात्र, ५ पेक्षा जास्त देण्याची त्यांची तयारी नव्हती. त्यामुळे स्वतंत्र भूमिका घेतली. त्यांनी आता विकासावर बोलून लढले पाहिजे. - डॉ. प्रतापसिंह पाटील, जिल्हाध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस (श.प.)

English
हिंदी सारांश
Web Title : Shiv Sena accuses NCP of pro-BJP stance in Dharashiv election.

Web Summary : Uddhav Sena accuses NCP of breaking alliance for BJP's benefit in Dharashiv municipal elections. NCP claims disrespect, prioritizing development over politics after seat allocation disagreements. Both parties prepare to contest independently.
टॅग्स :Municipal Electionमहानगरपालिका - नगरपालिका निवडणूकdharashivधाराशिवomraje nimbalkarओमराजे निंबाळकर