शहरं
Join us  
Trending Stories
1
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
2
MS Dhoni पहिल्याच चेंडूवर बोल्ड! पंजाब किंग्सच्या गोलंदाजांसमोर CSK ची शरणागती, डाव संपला
3
“राज ठाकरे ज्यांच्या प्रचारासाठी जातात तो उमेदवार पडतोच”; ठाकरे गटाचा खोचक टोला
4
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
5
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
6
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
7
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
8
'भारतसाठी कॅनडा सर्वात मोठी समस्या', एस जयशंकर यांचा जस्टिन ट्रुडोंना स्पष्ट इशारा, म्हणाले...
9
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
10
Video Viral : वृद्धीमान साहा संघाचे मनोबल उंचावत होता, पण विराट कोहलीनं दिली शिवी
11
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
12
६ धावांत ३ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
13
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!
14
‘भाजपाला विरोध करण्यासाठी दहशतवादी कसाबची बाजू घेता? थोडी तरी लाज बाळगा’, बावनकुळेंची वडेट्टीवारांवर टीका
15
CSK च्या प्ले ऑफच्या मार्गात अडथळे; २ मेन गोलंदाज मायदेशात परतले, दीपक चहरवरही प्रश्नचिन्ह
16
T20 वर्ल्ड कपमध्ये विराटला OUT करणं हेच ध्येय; पाकिस्तानी गोलंदाजानं बाळगलं 'स्वप्न'
17
'मराठी लोकांनी इथं येऊ नये'; व्हायरल जाहिरातीवर नेटकरी म्हणतात, 'हे पहिल्यांदा नाही'
18
मोदींना पाठिंबा देताच राज ठाकरेंची साथ सोडणारे कीर्तिकुमार शिंदे ठाकरे गटात, उद्धव ठाकरेंनी बांधलं शिवबंधन
19
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
20
अजितदादांचे पुत्र जय पवारांनी घेतली मनोज जरांगेंची भेट; कारण गुलदस्त्यात, चर्चांना उधाण

पूरग्रस्त महिलांच्या मदतीला धावली तुळजाभवानी; मंदिर ट्रस्ट पाठविणार २५ हजार साड्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 20, 2021 3:55 PM

Tulja Bhavani Temple : जिल्ह्याचे पालकमंत्री शंकरराव गडाख यांनी पूरग्रस्तांच्या मदतीसाठी नागरिकांना तर आवाहन केलेच, शिवाय तुळजाभवानीलाही साकडे घातले.

ठळक मुद्देतुळजाभवानी देवीला भाविकांकडून सहावार व नऊवार साड्या वाहिल्या जातात. १० ऑगस्टपर्यंत मंदिर समितीकडे वाहिलेल्या साड्यांचा सुमारे २५ हजार स्टॉक

उस्मानाबाद : देव माणसातच आहे. देवत्वाची प्रचीती ही संकटसमयी एकमेकांच्या मदतीला धावून जाण्यातूनच येत असते. याचीच अनुभूती गुरुवारी तुळजाभवानी मंदिर ट्रस्टने ( Tulja Bhavani Temple ) आणून दिली. कोकण, पश्चिम महाराष्ट्रातील पुराने हजारो कुटुंबे उघड्यावर आलेली असताना लाखो रुपयांच्या उत्पन्नावर पाणी सोडत तुळजाभवानी देवीला अर्पण केलेल्या सुमारे २५ हजार साड्या पूरग्रस्त भगिनींसाठी पाठविण्याचा निर्णय ट्रस्टने घेतला आहे. ( Tulja Bhavani rushed to the aid of flood-hit women; Temple Trust to send 25,000 sarees) 

काही दिवसांपूर्वी झालेल्या जोरदार पावसामुळे कोल्हापूर, रत्नागिरी, रायगड जिल्ह्यांतील पुराने हजारो कुटुंबे बाधित झाली. त्यांचे भरून न येणारे आर्थिक, मानसिक नुकसान झाले. अशा नागरिकांच्या मदतीला सरकारसोबतच सर्वसामान्यही जमेल ती मदत घेऊन धावून जात आहेत. उस्मानाबाद जिल्ह्यातही अनेक संस्था, संघटनांनी आपापल्या परीने अन्नधान्य, चादरी, कपडे अशी मदत पाठविली आहे. दरम्यान, जिल्ह्याचे पालकमंत्री शंकरराव गडाख यांनी पूरग्रस्तांच्या मदतीसाठी नागरिकांना तर आवाहन केलेच, शिवाय तुळजाभवानीलाही साकडे घातले. यानंतर लागलीच मंदिर समितीचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी पुढाकार घेत विश्वस्त आमदार राणाजगजितसिंह पाटील, नगराध्यक्ष सचिन रोचकरी व अन्य सदस्यांशी चर्चा करून मंदिराच्या वतीने देवीला अर्पण करण्यात आलेल्या नव्या साड्या पूरग्रस्त भगिनींसाठी पाठविण्याबाबत चर्चा केली. कोणतेही आढेवेढे न घेता विश्वस्तांनी या निर्णयास सकारात्मकता दर्शविल्याने तब्बल २५ हजार साड्या कोल्हापूर, रत्नागिरी, रायगड जिल्ह्यांना पाठविण्याचा अंतिम निर्णय घेण्यात आला आहे.

या साड्यांमुळे मिळतेय लाखो रुपयांचे उत्पन्नतुळजाभवानी देवीला भाविकांकडून सहावार व नऊवार साड्या वाहिल्या जातात. १० ऑगस्टपर्यंत मंदिर समितीकडे वाहिलेल्या साड्यांचा सुमारे २५ हजार स्टॉक आहे. यात १ हजार नऊवार, तर २४ हजार सहावार साड्या आहेत. नियमानुसार या साड्यांचा दरवर्षी लिलाव होत असतो. यातून लाखो रुपयांचे उत्पन्न मंदिराला मिळत असते. मात्र, यावेळी मदत म्हणून या साड्या पूरग्रस्तांना पाठविण्याचा निर्णय विश्वस्तांनी घेतला आहे. लवकरच या साड्या कोल्हापूर, रत्नागिरी, रायगड जिल्ह्यांच्या जिल्हाधिका-यांकडे पाठविण्यात येणार आहेत. 

टॅग्स :tuljapur-acतुळजापूरUsmanabad collector officeजिल्हाधिकारी कार्यालय उस्मानाबादfloodपूर