शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

तुळजाभवानी मातेची मंचकी निद्रा पूर्ण; घटस्थापनेने आजपासून शारदीय नवरात्रौसवास प्रारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 17, 2020 13:32 IST

Tulja Bhavani Mata Navratri १८ व १९ आॅक्टोबर रोजी देवीची नित्योपचार पूजा व रात्री छबिना हे विधी असतील़

ठळक मुद्दे बाहेरील भाविकांची गर्दी होऊ नये, यासाठी तुळजापुरात प्रवेश बंदी आहे़१ नोव्हेंबर रोजी होणार उत्सवाची सांगता

तुळजापूर (जि़ उस्मानाबाद) : ९ आॅक्टोबर रोजी सुरु झालेली तुळजाभवानी देवीची मंचकी निद्रा शनिवारी पहाटे पूर्ण झाली. यानंतर पूर्ववत सिंहासनावर मूर्ती प्रतिष्ठापना करून शनिवारी दुपारी घटस्थापनेने नवरात्रौत्सवास प्रारंभ होत आहे़ कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नवरात्री साधेपणाने साजरी होत आहे़ त्यामुळे बाहेरील भाविकांची गर्दी होऊ नये, यासाठी तुळजापुरात प्रवेश बंदी आहे़

१७ आॅक्टोबर रोजी तुळजाभवानी देवीची पहाटे मंचकी निद्रा संपुष्टात आली.  त्यानंतर सिंहासनावर मूर्तीची विधिवत प्रतिष्ठापना केली जाईल़ दुपारी १२ वाजता घटस्थापना होताच नवरात्रीस सुरुवात होणार आहे़ १८ व १९ आॅक्टोबर रोजी देवीची नित्योपचार पूजा व रात्री छबिना हे विधी असतील़ २० रोजी ललित पंचमीनिमित्त रथालंकार महापूजा व रात्री छबिना, २१ रोजी मुरली अलंकार महापूजा व रात्री छबिना, २२ रोजी विशेष शेषशाही अलंकार महापूजा व रात्री छबिना, २३ रोजी विशेष भवानी तलवार अलंकार महापूजा व रात्री छबिना, २४ रोजी महिषासुरमर्दिनी अलंकार महापूजा व पहाटे २ वाजता होमहवनास प्रारंभ, असे कार्यक्रम आहेत़ तसेच सकाळी ७ वाजून ५ मिनिटास पूर्णाहुती व रात्री छबिना, २५ रोजी महानवमीनिमित्त देवीची नित्योपचार अलंकार महापूजा व दुपारी १२ वाजता होमावर धार्मिक विधी करून घटोत्थापन होईल़ याच दिवशी रात्री नगरहून आलेल्या पलंग पालखीची मिरवणूक होईल़ 

१ नोव्हेंबर रोजी होणार उत्सवाची सांगता३० आॅक्टोबर रोजी कोजागरी पौर्णिमेच्या दिवशी उत्तररात्री देवी मूर्तीची सिंहासनावर प्रतिष्ठापना करण्यात येईल़ ३१ रोजी श्री तुळजा भवानी मंदिर पौर्णिमेला रात्री सोलापूर येथील काठ्यांसह छबिना व महंतांचा जोगवा होणार आहे़ १ नोव्हेंबर रोजी अन्नदान व रात्री सोलापूरच्या काठ्यांसह छबिना व शारदीय नवरात्रौत्सवाची सांगता करण्यात येणार आहे़ 

टॅग्स :Navratriनवरात्रीOsmanabadउस्मानाबाद