शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

तुळजाभवानीचा खजिना संशयाच्या भोवऱ्यात! ७१ ऐतिहासिक नाणी गायब झाल्याचा संशय

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 11, 2019 05:33 IST

महाराष्टÑाची कुलस्वामिनी तुळजाभवानी देवीचा मौल्यवान खजिना पुन्हा संशयाच्या फेºयात आला आहे. खजिना हस्तांतरण करताना दिलेल्या चार्ज पट्टीमध्ये दुर्मिळ व ऐतिहासिक ७१ नाण्यांचा उल्लेखच नसल्याने ही नाणी गेली कुठे? असा प्रश्न निर्माण झाला आहे.

उस्मानाबाद : महाराष्टÑाची कुलस्वामिनी तुळजाभवानी देवीचा मौल्यवान खजिना पुन्हा संशयाच्या फेºयात आला आहे. खजिना हस्तांतरण करताना दिलेल्या चार्ज पट्टीमध्ये दुर्मिळ व ऐतिहासिक ७१ नाण्यांचा उल्लेखच नसल्याने ही नाणी गेली कुठे? असा प्रश्न निर्माण झाला आहे. अ‍ॅड. शिरीष कुलकर्णी व पुजारी मंडळाचे माजी अध्यक्ष किशोर गंगणे यांनी याबाबतची तक्रार जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.तुळजापूर येथील श्री तुळजाभवानी मंदिरात साठा नोंद वही आहे. त्यामध्ये सर्व मौल्यवान वस्तुंची नोंद आहे. साठा नोंद वहीप्रमाणे जाणाºया अधिकाºयाने कायदेशीर बाबींचे पालन करून दुसºया अधिकाºयाकडे चार्ज देणे बंधनकारक आहे. ही सर्व प्रक्रिया करीत असताना सोन्याचे किती वस्तू आहेत? चांदीसह अन्य मौल्यवान वस्तुंची संख्या किती? त्यांचे वर्णन कसे आहे? त्यांचे वजन किती आहे? याची सविस्तर माहिती लिखित स्वरूपात स्पष्ट करणे आवश्यक आहे. पुरातन व मौल्यवान वस्तुंचा चार्ज देताना त्यातील तज्ज्ञांना बोलावणे आवश्यक होते. परंतु, तसे झाले नाही. केवळ एका कागदावर मौल्यावान वस्तुंचे हस्तांतरण केले आहे. त्यामध्ये या नाण्यांचा उल्लेखही नाही. नाण्यांबरोबर खजिन्यातील अन्य मौल्यवान ऐवजाचीही खातरजमा करण्याची आवश्यकता यानिमित्ताने व्यक्त होत आहे.काय आहे खजिन्यात..?श्री तुळजाभवानी मातेच्या खजिन्यात अत्यंत मौल्यवान दागिने आहेत़ अकरा डब्यांमध्ये ते ठेवण्यात आले आहेत़ यातील काही दागिने नित्य वापरासाठी तर काही प्रासंगिक उत्सवाच्या वेळी देवीला परिधान करण्यात येणारे आहेत़ याशिवाय, बिकानेर, औरंगजेब, चित्रकूट, इंदौर स्टेट, लखनौ, बडोदा, पोर्तुगिज यांच्यासह वेगवेगळ्या संस्थान, राजांनी त्या-त्यावेळी भेटवस्तू म्हणून मंदिराला दिलेली सुमारे ७१ नाणीही या खजिन्यात आहेत. नेमकी हीच नाणी आता गायब असल्याचा संशय आहे़

टॅग्स :Osmanabadउस्मानाबाद