शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

थरारक! सिनेस्टाईल पाठलाग करून पिकअप पकडले, मात्र चोरटे दगडफेक करत पसार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2022 16:17 IST

चोरट्यांची ग्रामस्थांवर अन्‌ ग्रामस्थांची चोरट्यांवर दगडफेक

उस्मानाबाद : तालुक्यातील तेर गावात आडत दुकानासमोर थांबलेल्या ट्रकमधील डिझेल चोरी करीत असताना आढळून आलेल्या चोरट्यांचा ग्रामस्थांनी दुचाकी अन्‌ चारचाकी वाहनाद्वारे पाठलाग केला. परंतु, हिंगळजवाडी गावानजीक चोरट्यांनी पीकअप जागेवर सोडून पोबारा केला. यादरम्यान, चोरट्यांनी ग्रामस्थांवर अन्‌ ग्रामस्थांनी चोरट्यांवर दगडफेक केली. चोरटे अन्‌ ग्रामस्थांमधील हा थरार सुमारे तीन तास सुरू होता. ही घटना सोमवारी पहाटे दोन वाजेच्या सुमारास घडली. 

सोमवारी पहाटेच्या सुमारास तेर येथील नवीन ग्रामपंचायतीजवळ असलेल्या दंडनाईक यांच्या आडत दुकानासमोर सोयाबीन भरलेला एक ट्रक उभा होता. पहाटे दोन वाजेच्या सुमारास तिघे चोरटे या ट्रकमधील डिझेल चोरण्याचा प्रयत्न करीत असतानाच ट्रकमध्ये झोपलेल्या चालकाला याची चाहूल लागली. त्यामुळे त्यांनी तातडीने फोन करून गावातील इतर युवकांना याची कल्पना दिली. यानंतर काही वेळातच पाच-सात युवक तेथे दाखल झाले. युवकांना पाहताच यातील दोघांनी पळ काढला तर तिसरा पिकअप घेऊन बसस्थानकाकडे गेला. युवकांनी परिसरात चोरट्यांचा शोध घेतला. मात्र, ते सापडले नाहीत.

दरम्यान, हे युवक गावात या घटनेची चर्चा करीत थांबलेले असतानाच काही वेळाने पुन्हा हा पिकअप तेथे दाखल झाला. ही बाब ग्रामस्थांच्या लक्षात येताच त्यांनी परत दुचाकी आणि चारचाकी वाहनातून या पिकअपचा पाठलाग सुरू केला. संत गोरोबाकका मंदिरापर्यंत पाठलाग केल्यानंतर हे पिकअप उस्मानाबादच्या दिशेने वळाले. यावेळी ग्रामस्थ आणि चोरटे एकमेकांवर दगडफेक करीत होते. ही घटना थरकाप उडवणारी होती. दरम्यान, चोरट्यांनी तेर गावापासून साधारण चार किमी अंतरावर हिंगळजवाडी गावाजवळ पिकअप सोडून पोबारा केला. यावेळी रात्रीची गस्त घालणाऱ्या पोलिसांनी हे पिकअप ताब्यात घेऊन पोलिस ठाण्यात आनले. याचा पुढील तपास पोलिस करीत आहेत. 

गाडीत चटणी पावडर, कोयता अन्‌ काठ्याहीयावेळी चोरटे व ग्रामस्थ एकमेकांवर दगडफेक करीत अतसाना चोरट्यांच्या पिकअपचा पुढचा काच फुटला. परंतु, चोरट्यांनी पिकअप तसेच पुढे नेले. हा पिकअप ताब्यात घेतल्यानंतर आतमध्ये चटणी पावडर, कोयता, काठ्या व चोरी करण्याचे इतर साहित्य देखील होते, असे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.

टॅग्स :theftचोरीOsmanabadउस्मानाबाद