शहरं
Join us  
Trending Stories
1
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
2
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
3
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
4
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
5
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
6
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
7
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
8
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
9
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
10
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
11
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
12
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
13
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
14
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
15
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
16
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
17
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
18
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
19
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
20
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
Daily Top 2Weekly Top 5

बनावट कागदपत्रावरून ट्रस्टच्या नावे बँकांत खाते काढून सट्ट्याचे सव्वातीन काेटी ठेवले

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 29, 2025 19:43 IST

हैदराबाद, सांगलीतील दाेघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे

धाराशिव : बनावट कागदपत्राच्या आधारे येथील ह्युमन हेल्थ केअर रिर्सोसेस चॅरिटेबल ट्रस्टच्या नावे दोन बँकांमध्ये खाते काढून सट्ट्याचे तब्बल तीन कोटी ३५ लाख रुपये ठेवून फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार मंगळवारी (दि. २७) उघडकीस आला. या प्रकरणी ट्रस्टच्या उपाध्यक्षांनी दिलेल्या फिर्यादीवरून हैदराबाद व सांगली येथील दाेघांविरुद्ध धाराशिव शहर ठाण्यात गुन्हा नाेंदविण्यात आला आहे.

हैदराबाद येथील आरोपी असद खान मुस्ताफा खान पठाण व सांगली येथील रुपेश सावरदेकर यांनी ७ जानेवारी ते १४ मार्च २०२५ या कालावधीत ह्युमन हेल्थ केअर रिर्सोसेस चॅरिटेबल ट्रस्टचे उपाध्यक्ष सलमान इकबाल पठाण (रा. गणेशनगर, धाराशिव) व इतर सदस्य यांच्या नावे बनावट नोटरी तयार करून उपाध्यक्षासह इतर पाच सदस्यांच्या बनावट स्वाक्षऱ्या तसेच अंगठे नोटरीवर घेतले. यानंतर महाराष्ट्र बँक शाखा, काळा मारुती चौक, धाराशिव व बँक ऑफ इंडिया शाखा, बार्शी नाका, धाराशिव येथे दाेन स्वतंत्र खाती उघडली.

या खात्यांवर सांगली येथील आरोपी रुपेश सावरदेकर याने क्रिकेट सट्टा (आयपीएल क्रिकेट मॅच) किंवा ऑनलाइन गेम सट्टा नावाची ३ कोटी ३५ लाख ९८ हजार २९२ रुपये एवढी रक्कम फिर्यादीच्या संमतीशिवाय वापरून फसवणूक केली. हा धक्कादायक प्रकार समाेर आल्यानंतर ट्रस्टचे उपाध्यक्ष सलमान पठाण यांनी २७ मे रोजी धाराशिव शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली. त्यावरून उपराेक्त दाेघा आराेपींविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीdharashivधाराशिव