शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

'शिव - शाहूंचे विचार, हाच राष्ट्राचा विकास'; छत्रपती संभाजीराजेंकडून स्वराज्य संघटनेची घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 10, 2022 18:06 IST

तुळजापुरातून मुहूर्तमेढ : लोगो, ध्वज, बोधवाक्याचे अनावरण, पहिली शाखा

तुळजापूर (जि. उस्मानाबाद) : छत्रपती संभाजीराजे यांच्या बहुचर्चित संघटनेची मुहूर्तमेढ क्रांतिदिनाचे औचित्य साधून तुळजापुरातून रोवण्यात आली. या संघटनेचे नाव स्वराज्य असे असून, ती शेतकरी, कामगारांच्या प्रश्नांवर काम करणार असल्याचे छत्रपती संभाजीराजे यांनी जाहीर केले. सोबतच लोगो, ध्वज व बोधवाक्याचे अनावरणही त्यांनी याप्रसंगी केले.

नुकत्याच झालेल्या राज्यसभा निवडणुकीच्या वेळी छत्रपती संभाजीराजे यांनी स्वतंत्र संघटना उभी करण्याचा निर्णय जाहीर केला होता. त्यानुसार मंगळवारी क्रांतिदिनाचे औचित्य साधत राजेंनी तुळजापुरातून स्वराज्य या संघटनेची घोषणा केली. प्रस्थापितांविरुद्ध विस्थापितांना लढण्यासाठी व सामान्यांवर झालेल्या अन्यायाच्या विरोधात न्यायासाठी ही संघटना लढणार असल्याचे त्यांनी यावेळी जाहीर केले. तुळजाभवानी देवीच्या महाद्वारात आयोजित कार्यक्रमातून त्यांनी संघटनेच्या स्थापनेमागचा हेतू विषद केला. मागच्या सात वर्षात राज्यात विविध पक्षांची सरकारे आली. मात्र, सामान्यांचे प्रश्न आहे तसेच राहिले. मराठवाडा उपेक्षित राहिला. या अन्यायाच्या विरोधात आपल्या संघटनेचा लढा राहणार आहे. पुढील एक वर्ष आपण राज्यभर फिरणार असून, त्यातून संघटन मजबूत करण्यात येईल, असेही छत्रपती संभाजीराजे यांनी सांगितले. यावेळी हजारो नागरिकांच्या उपस्थितीत संघटनेचा ध्वज व लोगोचे अनावरण 'जय भवानी जय शिवाजी, हर हर महादेव, संभाजी राजे आगे बढो, हम तुम्हारे साथ है' अशा घोषणा देत करण्यात आले.

ही आहे पंचसूत्री...स्वराज्य संघटनेची वाटचाल ही पंचसूत्रीवर आधारित राहणार आहे. यासाठी शेतकरी, कामगार, सहकार, शिक्षण व आरोग्य हे पाच विषय निवडण्यात आले आहेत. सोबतच गडकिल्ल्यांच्या संवर्धनासाठीही संघटना कार्यरत असेल, असे छत्रपती संभाजीराजे यांनी जाहीर केले.

बोधवाक्य अन् पहिली शाखा...संघटनेसाठी बोधवाक्यही तयार करण्यात आले आहे. शिव - शाहूंचे विचार, हाच राष्ट्राचा विकास, असे संघटनेचे बोधवाक्य असणार आहे. लोगो, ध्वज व बोधवाक्याचे अनावरण केल्यानंतर तुळजापुरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात संघटनेच्या राज्यातील पहिल्या शाखेचे उद्घाटन छत्रपती संभाजीराजे यांच्या हस्ते झाले.

टॅग्स :Osmanabadउस्मानाबादSambhaji Raje Chhatrapatiसंभाजी राजे छत्रपती