शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
6
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
7
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
8
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
9
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
10
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
11
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
12
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
13
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
14
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
15
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
16
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
17
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
18
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
19
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
20
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
Daily Top 2Weekly Top 5

अपयश झाकण्यासाठीच सत्ताधारी-विरोधकांची चिखलफेक; तुमचा खेळ होतो, लोकांचा जीव जातो - राजू शेट्टी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 20, 2022 11:55 IST

स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या बळीराजा हुंकार यात्रेनिमित्ताने राजू शेट्टी मंगळवारी तुळजापुरात आले होते.

तुळजापूर (जि. उस्मानाबाद) : राज्यातील वीज भारनियमनामुळे शेतीच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. दुसरीकडे शेतकऱ्यांनी पिकवलेल्या मालाला भाव नाही. इंधन, गॅस, खते, कीटकनाशक यांच्या दरात भरमसाठ वाढ होऊन महागाई वाढली आहे. राज्य आणि केंद्र सरकारचे हे अपयश आहे. ते झाकण्यासाठीच धार्मिक प्रश्न उपस्थित करून एकमेकांवर चिखलफेक केली जात असल्याचा आरोप माजी खा. राजू शेट्टी यांनी मंगळवारी येथे केला.स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या बळीराजा हुंकार यात्रेनिमित्ताने राजू शेट्टी मंगळवारी तुळजापुरात आले होते. यावेळी ते म्हणाले की, महागाईचे अपयश लपवण्यासाठी भाजप ईडी व धार्मिक प्रश्न उपस्थित करून राज्यात तेढ निर्माण करण्याच्या प्रयत्नात आहे, तर राज्य सरकारही विरोधकांच्या प्रश्नांवर उत्तर देण्यात आपला वेळ खर्ची घालत आहे. राज ठाकरे यांनी भोंग्यापेक्षा इंधन दरवाढ, वीजप्रश्नी पुढाकार घ्यावा, असा सल्ला दिला.

पवारांना हे माहिती नाही का?ऊस हे शेतकऱ्यांना आळशी बनवणारे पीक असल्याचे विधान खा. शरद पवार यांनी केले आहे. त्यावर राजू शेट्टी म्हणाले की, ऊस हे शेतकऱ्यांचे आळशी पीक नाही. ते हमीभाव देणारे खात्रीचे पीक असल्याने शेतकरी त्याचे उत्पादन घेतात. माजी कृषी मंत्री राहिलेल्या शरद पवार यांना हे माहिती नाही का, असा सवालही शेट्टी यांनी केला.कोळसाटंचाई; पैसे लाटायचा बहाणा...राज्यात सध्या कोळसाटंचाई असल्याचे सांगण्यात येत आहे. इकडे कोळशाची टंचाई दाखवायची अन् दुसरीकडे बेसुमार भावाने वीज खरेदी करून पैसे लाटायचे, यासाठी हा खटाटोप आहे. वीज खरेदी करण्यापेक्षा कोळसाच का खरेदी करीत नाही, असा आरोपही शेट्टी राज्य सरकारवर केला. 

टॅग्स :Raju Shettyराजू शेट्टीMahavikas Aghadiमहाविकास आघाडीBJPभाजपा