शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांचा भारतावर २५ टक्के टॅरिफ बॉम्ब; १ ऑगस्टपासून लागू होणार आयात शुल्क, दंडही आकारणार
2
भारत-पाक युद्ध तिसऱ्या देशाने थांबवले नाहीच; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी खोडला दावा
3
‘लाडकी बहीण’च्या लाभार्थी महिला कर्मचाऱ्यांवर कारवाई; राज्य सरकारने जारी केले आदेश
4
मालेगाव खटल्याचा निकाल आज; १७ वर्षांनी विशेष NIA कोर्ट निर्णय देणार, संपूर्ण देशाचे लक्ष
5
संघर्षाचा शेवट गोड! तिसऱ्या मजल्यावरून ३९ व्या मजल्यावर; बीडीडीवासीयांचा आनंद गगनात मावेना
6
सर्वांत महाग-शक्तिशाली निसार उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण; पृथ्वीची प्रत्येक इंच जमीन मॅप करणार
7
“मोदी यांच्या आचारसंहिता भंगप्रकरणी कोर्टात जाणार, निवडणूक आयोगाची कारवाईस टाळाटाळ”: चव्हाण
8
कृषी खात्यातील कथित भ्रष्टाचाराची चौकशी करा!; सुरेश धस यांचे मुख्यमंत्र्यांना पुन्हा पत्र
9
डिझेल दर सवलतीमुळे एसटीचे ११.८ कोटी वाचणार; स्पर्धात्मक निविदेमुळे महामंडळाला फायदा
10
देशातील विमानांमध्ये सुरक्षेच्या २६३ त्रुटी! सर्वाधिक एअर इंडिया, तिसऱ्या क्रमांकावर इंडिगो
11
मुंडेंचे नाव आले अन् माझा छळवाद सुरू झाला: अण्णा डांगे; भाजपात फेरप्रवेश, मन केले मोकळे
12
अतिक्रमित जमिनींचा मिळणार मालकी हक्क, ३० लाख कुटुंबांना लाभ; चंद्रशेखर बावनकुळेंची माहिती
13
रशियात ८.८ तीव्रतेचा भूकंप; जपान, अमेरिकेत त्सुनामीसारख्या लाटांचे थैमान; जगात भीतीचे ‘हादरे’
14
एकनाथ शिंदे दिल्लीत, देवेंद्र फडणवीस राज्यपालांच्या भेटीला; महायुतीत काहीतरी मोठं घडतंय? 
15
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
16
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?
17
"बळजबरी आणि दबावाने काहीही..."; डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ इशाऱ्याला चीनचे जशास तसे उत्तर
18
सारा तेंडुलकरची मैत्रीण बनली दिल्ली प्रीमियर लीगची स्पोर्ट्स अँकर, कोण आहे 'ती'? जाणून घ्या
19
मोटो जी ८६ पॉवर 5G भारतात लॉन्च, जाणून घ्या खिसियत आणि किंमत!
20
ड्रग्ज पार्टीच्या कारवाईचे व्हिडिओ व्हायरल कोणी केले? रोहिणी खडसे यांचा पोलिसांना सवाल

मजुरास फाेन करून ठावठिकाणा घेतला अन् घरी जाऊन त्याच्या मुलीवर अत्याचार केला!

By बाबुराव चव्हाण | Updated: March 25, 2023 18:44 IST

एका अल्पवयीन मुलीस धमकावून अत्याचाराचे केले छायाचित्रण 

तुळजापूर (जि. धाराशिव) - सहावीच्या वर्गात शिकत असलेल्या एका १२ वर्षीय अल्पवयीन मुलीवर ३३ वर्षीय नराधमाने लैंगिक अत्याचार केला. हा नराधम एवढ्यावरच थांबला नाही. नात्यातील एका मुलीस धमकावून अत्याचाराचे माेबाइलमध्ये छायाचित्रण करण्यासही भाग पाडले. ही संतापजनक घटना तुळजापूर तालुक्यातील एका गावात गुरुवारी घडली. या प्रकरणी शुक्रवारी तुळजापूर पाेलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. पाेलिसांनी शनिवारी सकाळी सापळा रचून ज्वारीच्या शेतात दडून बसलेल्या नराधमास बेड्या ठाेकल्या.

पीडित मुलीचे आई-वडील माेलमजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवितात. त्यामुळे ते दिवसभर घरी नसतात. गुरुवारी ते घरी आहेत की नाही, हे जाणून घेण्यासाठी नराधमाने पीडितेच्या वडिलांना फाेन करून ‘कुठे आहात?’ अशी विचारणा करून त्यांचा ठावठिकाणा घेतला. घरी नसल्याची खात्री हाेताच नराधमाने पीडितेचे घर गाठले. यावेळी घरात पीडित चिमुकलीच्या चार बहिणीही हाेत्या. दरम्यान, बारा वर्षीय चिमुकलीस आतल्या खाेलीत नेऊन अत्याचार केला. 

यावेळी नात्यातील एका अल्पवयीन मुलीस धमकावून माेबाइलमध्ये अत्याचाराचे छायाचित्रण करण्यास तिला भाग पाडले. याचवेळी पीडित चिमुकलीची आई घरी आल्याची भणक लागताच नराधमाने घरातून धूम ठाेकली. मात्र, छायाचित्रण केलेला माेबाइल घरातच पडला. आईला पाहून पीडित चिमुकलीने हंबरडा फाेडला. 

सर्व हकिकत सांगितल्यानंतर पीडितेला घेऊन आई-वडिलांनी तुळजापूर पाेलीस ठाणे गाठून फिर्याद दिली. त्यावरून संबंधित नराधमाविरुद्ध शुक्रवारी कलम ३७६ (३), ३७७, भादंविसंचे कलम ४, ६, ८, १०, १२, १४ पाेस्काे ६६ (ई) आयटी ॲक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, गुन्हा नाेंद हाेताच पाेलिसांनी नराधमाचा शाेध सुरू केला. ताे गावातीलच ज्वारीच्या शेतात दडून बसल्याची माहिती मिळाल्यानंतर पाेलिसांनी सापळा रचला अन् त्यास बेड्या ठाेकल्या.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीOsmanabadउस्मानाबाद