शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

महामार्ग झाला पण मावेजा नाही;  शेतकऱ्यांकडून घोषणाबाजीत रस्त्याचे प्रतीकात्मक लोकार्पण

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 2, 2023 19:13 IST

शेती आमच्या हक्काची, नाही कुणाच्या बापाची; घोषणांनी वेधले प्रशासनाचे लक्ष

- गणेश कुलकर्णीधाराशिव: नळदुर्ग-अक्कलकोट महामार्गासाठी शेतजमिनीचे भूसंपादन व रीतसर मावेजा न देता केलेल्या रस्ताकामाचे तुळजापूर तालुक्यातील शहापूर शिवारातील चंद्रकांत शिंदे यांच्या शेताजवळ गुरुवारी शेतकऱ्यांनी प्रतीकात्मक लोकार्पण केले. या लोकार्पण सोहळ्यासाठी अधिकाऱ्यांनाही निमंत्रित करण्यात आले होते, परंतु एकही अधिकारी आंदोलनस्थळी फिरकले नाहीत.

मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने दिलेल्या आदेशाप्रमाणे संयुक्त भूसंपादन मोजणी व फेरसंयुक्त मोजणी अहवालाप्रमाणे शेतकऱ्यांच्या मालकी हक्काचे बाधित क्षेत्र तत्काळ संपादित करुन मावेजा देण्यात यावा, सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचा अवमान करणाऱ्या भूसंपादन अधिकारी माने यांची खातेनिहाय चौकशी करून तत्काळ बदली करावी व इतर प्रमुख मागण्यांसाठी वेळाेवेळी पाठपुरावा केला. परंतु, प्रशासनाने दखल घेतली नाही. त्यामुळे संतप्त शेतकऱ्यांनी गुरुवारी तुळजापूर तालुक्यातील शहापूर शिवारात रस्त्याचे प्रतीकात्मक लाेकार्पण केले.

यावेळी उपस्थित शेतकर्यानी ‘शेतकरी एकजुटीचा विजय असो, शेती आमच्या हक्काची.. नाही कुणाच्या बापाची..’ अशा जोरदार घोषणा देत आपल्या मागण्याकडे प्रशासनाचे लक्ष वेधून घेतले. दरम्यान, या साेहळ्यासाठी अधिकाऱ्यांनाही आमंत्रित केले हाेते. परंतु, आंदाेलनस्थळी एकही अधिकारी उपस्थित नव्हते. याप्रसंगी शेतकरी संघर्ष समितीचे कार्याध्यक्ष सरदारसिंग ठाकूर, व्यंकट पाटील, प्रशांत शिवगुंडे, बाळासाहेब लोंढे पाटील, दिलीप पाटील, पंडित पाटील, पंडित निकम, लक्ष्मण निकम, खंडू हलकंबे, काशिनाथ काळे, सुभाष पाटील, रहमान शेख, प्रताप ठाकूर, बालाजी ठाकूर, दयानंद लोहार, तोलू पाटील, बंडू मोरे, आबा मोरे, तुकाराम सुरवसे, नरसिंग निकम यांच्यासह शेतकरी उपस्थित हाेते.

टॅग्स :Osmanabadउस्मानाबादFarmerशेतकरी