शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

उस्मानाबादेतील मराठा समाजातील विद्यार्थ्यांचे वसतिगृह केवळ नावालाच ! 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 6, 2019 20:26 IST

वसतिगृहात फक्त निवासाची सोय; मेसचा नाही पत्ता... 

उस्मानाबाद : मराठा क्रांती मोर्चाच्या आंदोलनादरम्यान सरकारने या समाजातील विद्यार्थ्यांसाठी प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी सुसज्ज वसतिगृह सुरू करू, अशी ग्वाही दिली होती. त्यानुसार यंदा येथे वसतिगृह सुरू होत आहे. मागासवर्गीय विद्यार्थी वसतिगृहाच्या धर्तीवर सदरील वसतिगृहात केवळ मराठा विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जाईल, असे अपेक्षित होते. परंतु, ज्यांचे उत्पन्न ८ लााखांच्या आत आहे, अशा सर्वच घटकांना प्रवेश दिला जाणार आहे. विशेष म्हणजे, येथे केवळ निवासाची सोय आहे. जेवणाचा पत्ता नाही. आणि वसतिगृहासाठी जी वास्तू निश्चित केली आहे, तीही गैरसोयीचीच अधिक असल्याने संताप व्यक्त होत आहे.

मराठा समाजातील होतकरू आणि गरजू विद्यार्थ्यांसाठी प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी शासकीय वसतिगृह असावे, अशी आरक्षणासह विविध मागण्यांपैकी एक असेली मागणी मराठा क्रांती मोर्चाने प्रत्येक मोर्चामध्ये लावून धरली होती. महाराष्ट्रबंदच्या आंदोलनातदेखील मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने वसतिगृहाच्या मागणीचा मुद्दा उपसिथत केला होता. त्यानुसार समाजातील मुलांसाठी साधारपणे वर्षभरापूर्वी म्हणजेच २०१८ मध्ये पहिले वसतिगृह कोल्हापूर येथे सुरू करण्यात आले. चालू शैक्षणिक वर्षापासून उस्मानाबाद येथे डॉ़ पंजाबराव देशमुख वसतिगृह निर्वाह भत्ता योजनेच्या माध्यमातून वसतिगृह सुरू करण्यात येत आहे. वसतिगृहासाठी इमारतही निश्चित करण्यात आली आहे. या ठिकाणी मागासवर्गीय विद्यार्थी वसतिगृहाच्या धर्तीवर केवळ समाजातील विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जाईल, असे अपेक्षित होते. तसे आंदोलनादरम्यान सांगितलेही जात होते. मात्र, प्रत्यक्ष प्रवेश प्रक्रियेला सुरूवात झाली असता, अनेक बाबी समोर येवू लागल्या आहेत. ज्यांचे उत्पन्न आठ लाखापेक्षा कमी आहे, अशा सर्वच घटकांतील विद्यार्थ्यांना वसतिगृहात प्रवेश दिला जाणार आहे. 

मराठा समाजातील बहुतांश विद्यार्थ्यांची आर्थिक परिस्थिती कमकुवत आहे. शिक्षणासाठी जिल्ह्याच्या ठिकाणी आलेल्या अनेकांना जेवनाचा आणि निवासाचा खर्च भागवणे कठीण होते. हा प्रश्न लक्षात घेऊन आंदोलनादरम्यान वसतिगृहाची मागणी पुढे आली होती. मात्र, सरकार जे वसतिगृह सुरू करीत आहे, तेथे केवळ निवासाची सोय आहे. जेवनाचा (मेस) पत्ता नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या जेवनाचे काय? हा प्रश्न अनुत्तरीतच राहतो. हे थोडके म्हणून की काय, वसतिगृहासाठी निश्चित केलेली इमारतही सोयीची कमी अन् गैैरसोयीची अधिक आहे. तंत्रनिकेतन कॉलेज परिसरातील इमारतीत हे वसतिगृह चालविले जाणार आहे. त्यामुळे एखाद्या विद्यार्थ्याला तेरणा महाविद्यालय अथवा भोसले कॉलेजला यायचे म्हटले तर दररोज प्रवास भाड्यापोटी  किमान तीस ते चाळीस रूपये मोजावे लागणार आहेत. म्हणजेच प्रवास भाड्यावर महिन्याकाठी हजार ते बाराशे रूपये खर्च होतील. आणि शासन निर्वाह भत्ता म्हणून केवळ आठ हजार रूपये विद्यार्थ्यांच्या खात्यावर जमा करणार आहे. सदरील रक्कम ज्या संस्थेने वसतिगृह चालविण्यासाठी घेतले आहे, त्यांना वर्ग करावी लागणार आहे. हे सर्व चित्र पाहता, मराठा विद्यार्थ्यांसाठीचे वसतिगृह केवळ नावालाच उरते की काय? असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होवू लागला आहे.

विद्यार्थ्यांनी फिरविली पाठ... वसतिगृहात प्रवेश घेण्यासाठी विद्यार्थ्यांना आॅनलाईन अर्ज करावा लागणार आहे. १ जुलैै पासून ही प्रक्रिया सुरू झाली. परंतु, ५ जुलैैपर्यंत एकाही विद्यार्थ्याने वसतिगृहासाठी अर्ज केलेला नाही. केवळ निवासाचीच सोय असल्याने विद्यार्थ्यांत निरूत्साह आहे.

मुलींच्या वसतिगृहाचे काय?मराठा समाजातील मुला-मुलींसाठी वसतिगृह सुरू करण्याचे आश्वासन शासनाने दिले होते. मुलांसाठीचे वसतिगृह सुरू होत असले तरी मुलींसाठी वसतिगृह सुरू करण्याबाबत अद्याप जिल्हा प्रशासनाकडे कसल्याही स्वरूपाची माहिती आली नसल्याचे सूत्रांनी सांगितले.

टॅग्स :Osmanabadउस्मानाबादMaratha Kranti Morchaमराठा क्रांती मोर्चाStudentविद्यार्थी