शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
5
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
6
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
7
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
8
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
9
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
10
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
11
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
12
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
13
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
14
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
15
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
16
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
17
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
18
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
19
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
20
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

साहित्य संमेलनाच्या पूर्वसंध्येला विचारांचे वादळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 10, 2020 06:15 IST

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे उद्घाटन शुक्रवारी अध्यक्ष फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांच्या भाषणाबरोबरच साहित्यिक, वैचारिक चर्चा वाद-प्रतिवाद व संवादांसाठी खुले होईल.

प्रवीण खापरे उस्मानाबाद : अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे उद्घाटन शुक्रवारी अध्यक्ष फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांच्या भाषणाबरोबरच साहित्यिक, वैचारिक चर्चा वाद-प्रतिवाद व संवादांसाठी खुले होईल. संमेलनात स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या अवमान प्रकरणाचा निषेध करा, एनआरसी व नागरिकत्व दुरुस्ती कायदा रद्द करण्याची शिफारस करणारा ठराव करा, अशा मागण्यांमुळे आधीच वादळ उठले आहे.संत गोरोबा काकांच्या नगरीत ९३ व्या साहित्य संमेलनाला सुरुवात होणार आहे. मात्र, संमेलनाच्या पूर्वसंध्येपर्यंत अध्यक्षांचे भाषण सार्वजनिक करण्यात आलेले नाही. त्यामुळे फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांच्या भाषणात नेमके कोणते मुद्दे असणार याबाबत उत्सुकता आहे. यापूर्वीच नियोजित अध्यक्ष म्हणून दिब्रिटो यांनी आपल्या भाषणाचा मूळ मुद्दा भारतीय राज्यघटना व धर्मनिरपेक्षता असल्याचे स्पष्ट केले आहे.साहित्य आणि संस्कृतीवर भाष्य करताना संमेलनाध्यक्ष फादर दिब्रिटो सध्याच्या राजकीय व सामाजिक परिस्थितीवरही आपले परखड विचार मांडतील. नागरिकत्व दुरुस्ती कायदा आणि एनआरसीवर ते विस्ताराने बोलण्याची शक्यता आहे.उस्मानाबादमध्ये रिपब्लिकन सेनेने एनआरसी व नागरिकत्व कायदा रद्द करण्याचा ठराव साहित्य संमेलनात मंजूर करण्यात यावा, असे पत्रक काढले आहे.स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर हेही पूर्वी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते. त्यामुळे काँग्रेस सेवा दलाच्या पुस्तिकेत त्यांच्याबद्दल आक्षेपार्ह मजकूर प्रसिद्ध करून अवमान केल्याप्रकरणी निषेधाचा ठराव घ्यावा, असा सूरही सावरकरप्रेमींनी आळवला आहे.महाराष्ट्रातील साहित्यिक आणि कवी यांनी जेएनयूमधील हल्ल्यावर आतापर्यंत दिलेल्या प्रतिक्रिया तसेच नागरिकत्व कायद्याचा अंमल करू नका म्हणून पुकारलेला एल्गार हाच संमेलनाध्यक्षांच्या भाषणाचा गाभा असणार आहे.>वाचण्यासारखे काय आहे?उस्मानाबादचे साहित्य संमेलन ‘एकविसाव्या शतकात मराठी साहित्यात वाचण्यासारखे काय आहे?’ हे सांगणार आहे. तसा स्वतंत्र परिसंवादच होणार आहे. शेतकरी आत्महत्या आणि मराठवाडा यावर तसेच ‘शेतकऱ्यांचा आसूड : महात्मा फुले’ या विषयावर आजच्या संदर्भात संमेलनात चर्चा होणार आहे.>दिब्रिटो आजारी... संमेलनाध्यक्ष दिब्रिटो यांना कंबरदुखीचा त्रास होत असल्याने ते सकाळी ग्रंथदिंडीला उपस्थित राहणार नसल्याचे त्यांचे भाचे जेम्स लोबो यांनी सांगितले. त्यात उद््घाटक महानोर यांचीही प्रकृती ठीक नसल्याने ग्रंथदिंडीला दोन्ही मान्यवर उपस्थित न राहण्याची शक्यता आहे. दिंडीवेळी जाहीर वाद टाळण्यासाठी दोघे अनुपस्थित राहतील, अशी चर्चा संमेलनस्थळी सुरू आहे.>उद्घाटक महानोर यांना जाऊ नका असा फोनसाहित्य संमेलनाचे उद्घाटक पद्मश्री ना़ धों़ महानोर यांना तुम्ही संमेलनाला जाऊ नका, असा फोन करण्यात आला. परंतु, महानोर पूर्वनियोजित कार्यक्रमानुसार उद्घाटन सोहळ्यास उपस्थित राहणार आहेत़ महानोर यांचे नातू शशिकांत यांनी त्यास दुजोरा दिला. फादर दिब्रिटो यांना आमचा विरोध आहे़ महानोर यांनीही येऊ असे आवाहन आम्ही केले आहे, असा संदेश ब्राह्मण महासंघाचे आनंद दवे यांनी ‘लोकमत’च्या प्रतिनिधीस पाठविला आहे़

टॅग्स :Marathi Sahitya Sammelanमराठी साहित्य संमेलन