शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

SSC Result 2019: 'त्याने' मिळवले सर्वच विषयात मिळाले ३५ गुण... 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 8, 2019 19:09 IST

शाळा व शेतीचा मेळ बसवीत मिळेल त्या वेळेत त्याने झेपेल तितका अभ्यास केला.

तुळजापूर (जि. उस्मानाबाद) : एकिकडे १०० टक्के गुण मिळविण्याची रस्सीखेच सुरु असतानाच उस्मानाबाद जिल्ह्यातील आपसिंग्याच्या एका विद्यार्थ्याने सर्वच विषयात बरोबर ३५ गुण मिळवून उत्तीर्ण होण्याचा ‘पराक्रम’ केला आहे. विशेष म्हणजे त्याने उमेद न हरता बारावीत चांगल्या गुणांनी उत्तीर्ण होवून दाखविण्याचा आत्मविश्वास बोलून दाखविला.

रोहित रोहिदास सोनवणे, असे या विद्यार्थ्याचे नाव आहे़ त्याने तुळजापूर तालुक्यातील आपसिंगा येथील नरेंद्र आर्य विद्यालयातून दहावीची परिक्षा दिली होती. शनिवारी जाहीर झालेल्या निकालात रोहितला मराठी, हिंदी, इंग्रजी, गणित, विज्ञान आणि सामाजिक शास्र अशा सर्वच विषयात प्रत्येकी ३५ गुण मिळाले आहेत. त्याच्या या हटके यशाची जिल्ह्याभरात चर्चा आहे. 

तुळजापूर तालुक्यातील कांद्याचे कोठार म्हणून ओळखल्या जाणा-या आपसिंगा गावातील रोहितचे वडील रोहिदास सोनवणे हे व त्यांच्या पत्नी शेती करून कुटुंबाची उपजीविका भागवितात. रोहितचा एक भाऊ आठवीत तर बहीण सहावीचे शिक्षण घेत आहे़ रोहितचे आई-वडील हे दहावीपर्यंतही शिक्षण घेऊ शकले नाही़ त्यामुळे मुलांच्या शिक्षणाप्रती ते जागरुक आहेत. असे असले तरी घरची परिस्थिती प्रतिकूल असल्याने व भावंडातील सर्वात मोठा असल्याने रोहित हा आई-वडिलांना शेती कामात मदत करायचा. 

शाळा व शेतीचा मेळ बसवीत मिळेल त्या वेळेत त्याने झेपेल तितका अभ्यास केला. दहावीची परिक्षा दिल्यानंतर त्याला स्वत:ला यशाची खात्री होती. आई-वडिलांना मात्र, चांगल्या गुणांची अपेक्षा होती. निकालानंतर रोहितचे आई-वडिल काहिसे नाराज दिसले. मात्र, जिल्हाभर झालेल्या चर्चेनंतर व रोहितने त्यांना पुढील शिक्षणात कमी न पडण्याचा शब्द दिल्यानंतर मात्र, त्याची त्यांची कळी खुलली.

मी आता बारावीचा विचार करतोय : रोहित सोनवणेदहावीला कमी टक्केवारी पडली असली तरी याचा विचार मी करीत नाही. पुढे बारावीत जास्तीत-जास्त गुण संपादन करण्याचा मानस आहे. वडिलांना शेतीत मदत करीत जमेल व झेपेल तेवढा अभ्यास करून मी परीक्षा दिली होती.कमी टक्केवारी पडल्याचा विचार न करता नव्या उमेदीने पुढील शिक्षणाचा विचार करीत असल्याची प्रतिक्रिया रोहितने ‘लोकमत’शी बोलताना दिली.

टॅग्स :SSC Resultदहावीचा निकालOsmanabadउस्मानाबाद