शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

दुकानात शिरला भरधाव टिप्पर, दांम्पत्याचा चिरडून मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 11, 2020 14:32 IST

या भीषण अपघातात दुकानामध्ये झोपलेल्या सहा पैकी दोघांचा मृत्यू झाला.

ठळक मुद्देजखमी चार पैकी दोघे गंभीर आहेत.

ढोकी (जि.उस्मानाबाद) : पुणे-लातूर मागार्वरील ढोकी येथे चालकाचे नियंत्रण सुटलेला एक भरधाव टिप्पर दुकानात घुसल्याने अपघात घडून आला. यामध्ये दुकानात झाेपलेले पती-पत्नी टिप्परखाली चिरडून जागीत मृत्युमुखी पडले आहेत. तर अन्य दोघे गंभीर जखमी झाले. ही घटना मंगळवारी  मध्यरात्री घडली आहे.

प्रकाश बाबुराव सुरवसे (५५) व मुद्रिका प्रकाश सुरवसे (५०), असे अपघातात मृत्युमुखी पडलेल्या दांम्पत्याची नावे आहेत. सुरवसे कुटुंब हे दुकानातच राहत होते. त्यांचे दुकान लातूर-पुणे रस्त्यालगत आहे. आपल्या मोठ्या मुलाकडे रात्रीचे जेवण करून हे दोघेही आपल्या दुकानात येऊन झोपले होते. समोरच्या बाजूला प्रकाश सुरवसे व त्यांची पत्नी हे दोघे झोपले होते. तर मागच्या बाजूला त्यांचा मुलगा, सून व त्यांची दोन मुले असे चौघेजण झोपले होते. दरम्यान, मध्यरात्री ११ वाजेनंतर एक रिकामा टिप्पर लातूरच्या दिशेने निघाला होता. चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने ते अनियंत्रित होऊन विरुद्ध दिशेला येऊन दुकानात शिरला. समोरच्या बाजूला झोपलेले प्रकाश सुरवसे यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला तर त्यांची पत्नी मुद्रका सुरवसे यांचा उपचारासाठी रुग्णवाहिकेतून नेताना रस्त्यातच मृत्यू झाला.

टिटू गणपत सुरवसे (६) व अक्षता प्रल्हाद सुरवसे (१०) हे चिमुरडे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर सोलापूर येथे रुग्णालयात उपचार सुरु करण्यात आले आहेत. तर गणपत सुरवसे व पल्लवी सुरवसे हे दोघे या अपघातातून बचावले. घटनेची माहिती मिळताच मदतीसाठी ग्रामस्थ जमा झाले. त्यांनी जखमींना उपचारासाठी पाठविण्यात मदत केली. दरम्यान, याच अपघातात या दुकानाशेजारील एक गॅरेज व अन्य दोन दुकानांचेही मोठे नुकसान झाले आहे. या दुकानांत कोणीही नसल्याने अनर्थ टळला. दरम्यान, मयत प्रकाश व मुद्रिका सुरवसे यांचे ढोकी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात शवविच्छेदन करून दोघांवरही बुधवारी सकाळी त्यांच्या मूळ गावी कळंब येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

टॅग्स :AccidentअपघातDeathमृत्यूOsmanabadउस्मानाबाद