शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

फादर दिब्रिटो यांच्या साहित्याचे खास दालन

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 10, 2020 05:56 IST

साहित्य संमेलनाच्या पार्श्वभूमीवर महिन्याभरात पुस्तकांच्या विक्रीत १०-१५ टक्क्यांनी वाढ झाली आहे.

प्रज्ञा केळकर-सिंग संत गोरोबा काका साहित्यनगरी (उस्मानाबाद) : साहित्य संमेलनाच्या पार्श्वभूमीवर महिन्याभरात पुस्तकांच्या विक्रीत १०-१५ टक्क्यांनी वाढ झाली आहे. संत साहित्याचे अभ्यासक, कार्यकर्ते, ठाम भूमिका घेणारे साहित्यिक म्हणून ओळख असलेले संमेलनाध्यक्ष फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांच्या साहित्याचे वेगळे दालन उभारले जाणार असून, त्यांच्या पुस्तकांवर ४० टक्क्यांपर्यंत सवलत दिली जाणार आहे.दिब्रिटो यांची ‘नाही मी एकला’ हे आत्मकथन, ‘सृजनाचा मळा’ हे ललित लेखन, पोप जॉन पॉल यांचे चरित्र, सुबोध बायबलचे दोन खंड, ‘ओएसिसच्या शोधात’ आणि ‘संघर्ष यात्रा ख्रिस्त भूमीची’ ही पाच पुस्तके प्रकाशित करण्यात आली आहेत. त्यापैकी बायबलचे दोन खंड आऊट आॅफ प्रिंट असल्याने इतर पुस्तकांना चांगली मागणी प्राप्त झाली आहे. संमेलनाच्या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा वाचकांकडून पसंती मिळत आहे.प्रकाशक सदानंद बोरसे म्हणाले, फादर केवळ लेखक नाहीत. चळवळीत उतरून क्रियाशील सहभाग घेणारे, समाजाबद्दल आस्था असणारे, धर्माच्या भिंती भेदून समाजहितैषी भूमिका घेणारे साहित्यिक आहेत. त्यांचा समाजाकडे पाहण्याचा दृष्टिकोन अत्यंत व्यापक आहे. ते केवळ भाष्य करत नाहीत, तर त्यासाठी प्रत्यक्ष सहभागी होण्याची त्यांची तयारी असते. हरित वसईसाठी त्यांनी केलेला संघर्ष सर्वांनी पाहिला आहे. त्यांचा संघर्ष अजूनही सुरू आहे आणि धडपड वाखाणण्याजोगी आहे.>नेत्यांना मंचासमोर पहिल्या रांगेत स्थान : संमेलनाचे निमंत्रण नेत्यांना व मंत्र्यांना देण्यात आले आहे़ ज्यांनी संमेलनास उपस्थित राहण्याचे कळविले आहे, त्यांच्यासाठी मंचासमोरील पहिल्या रांगेत सन्मानपूर्वक व्यवस्था करण्यात आल्याचे आयोजकांनी सांगितले़>प्रमुख साहित्यमंचासह अन्य दोन भव्य मंचही तयार झाले आहेत़ शहरातील भिंती विविध सामाजिक, पर्यावरणीय संदेश देणाऱ्या चित्रांनी रंगविण्यात आल्या आहेत़ शहराच्या चारही दिशांनी स्वागतकमानी उभारण्यात आल्या आहेत़>नुकत्याच झालेल्या एका ग्रंथ प्रदर्शनामध्ये फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांच्या ‘नाही मी एकला’ या आत्मचरित्राला चांगला प्रतिसाद मिळाला. अजूनही वाचकांकडून पुस्तकाबाबत विचारणा आणि खरेदी केली जाते.- रसिका राठीवडेकर

टॅग्स :Marathi Sahitya Sammelanमराठी साहित्य संमेलन