शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारमध्ये INDIA आघाडीत फूट? जागावाटप अन् CM चेहऱ्यावरून काँग्रेस-आरजेडीत घमासान
2
बांगलादेशी सैन्याची चाल, भारतासाठी धोक्याची घंटा; 'चिकन नेक'जवळ तैनात होणार चीनची लढाऊ विमाने?
3
ओबीसींना राजकारणापासून वंचित ठेवण्याचे षडयंत्र हाणून पाडले - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
4
IND W vs ENG W : स्मृतीची सेंच्युरी हुकली तिथंच मॅच फिरली; भारताच्या तोंडचा घास हिसकावून इंग्लंडनं गाठली सेमीफायनल
5
डोनाल्ड ट्रम्प यांच्याविरोधात सर्वात मोठं आंदोलन; अमेरिकेत रस्त्यावर उतरले ७० लाख लोक, कारण काय?
6
IND W vs ENG W : 'सासर माझं सुरेख बाई!' इंदूरच्या मैदानात स्मृतीनं तोऱ्यात साजरी केली फिफ्टी
7
ट्रेनमध्ये समोसा विकणाऱ्याची दादागिरी; २० रुपयांच्या समोशासाठी २ हजारांची स्मार्टवॉच हिसकावली!
8
...अशा लोकांचा बँन्ड जनता वाजवते; एकनाथ शिंदे यांची राज ठाकरेंवर बोचरी टीका
9
IND vs AUS : कॅप्टन्सीत जे किंग कोहलीबाबत घडलं तेच प्रिन्स गिलच्या वाट्याला आलं
10
श्रीराम नगरीत दीपोत्सवाचा विश्वविक्रम; २६ लाखांहून अधिक दिव्यांनी उजळली अयोध्या
11
भारताच्या लेकीचा जगात डंका !! बॅडमिंटनपटू तन्वीने तब्बल १७ वर्षानंतर देशासाठी जिंकलं पदक
12
डॉक्टर पतीने बायकोचा केला धक्कादायक शेवट; हत्या करायची पद्धत समजल्यावर पोलिसही चक्रावले...
13
शनिवार वाड्यात नमाज पठणाने वाद; खासदार मेधा मुलकर्णींनी शेअर केला 'तो' व्हिडिओ...
14
दहशतवाद्यांना भारतात घुसखोरी करणं भारी पडणार; 'रोबोटिक खेचर'ची नजर, सीमेवर जवानांना मिळाला साथी
15
...तर 'त्या' मुलीचं तंगडं तोडा; भाजपाच्या माजी खासदार प्रज्ञा ठाकूर यांचा आई वडिलांना अजब सल्ला
16
महायुतीत वाद! मुरलीधर मोहोळ यांनी केंद्रीय मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा; शिंदेसेनेचे नेते आक्रमक
17
VIDEO : वजन कमी करण्यासाठी 'वडापाव' सोडला; आता रोहित 'पॉपकॉर्न' खाताना दिसल्यावर अभिषेक नायर म्हणाला...
18
बनावट पासपोर्ट रॅकेट उघडकीस; 400 बांग्लादेशी घुसखोरांना मिळाला भारतीय पासपोर्ट!
19
मतचोरी करूनच मोदी पंतप्रधान आणि फडणवीस मुख्यमंत्री झालेत..; काँग्रेस प्रदेशाध्यक्षांचा आरोप
20
IND vs AUS 1st ODI : टीम इंडियाला पराभवाचा धक्का; ऑस्ट्रेलियानं पर्थच्या मैदानात जिंकला पहिला सामना

बापासोबत वाद, पोराचे थेट कोयत्याचे वार; नळदुर्गमध्ये सामाजिक कार्यकर्त्याची निर्घृण हत्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 28, 2025 18:26 IST

नळदुर्ग शहरातील थरार; खुन्नस का दिली म्हणून सुरू झालेल्या वादातून सामाजिक कार्यकर्त्याचा जीव गेला

नळदुर्ग (जि. धाराशिव) : ‘‘माझ्या वडिलांना मारताेस काय?’’ असे म्हणत हाती धारदार शस्त्र (काेयता) घेऊन आलेल्या बावीस वर्षीय तरुणाने सपासप वार करून चाळीस वर्षीय व्यक्तीचा मुडदा पाडला. ही थरारक घटना नळदुर्ग बस्थानकासमाेरील एका हाॅटेलच्या समाेर मंगळवारी रात्री उशिरा घडली. 

याप्रकरणी बुधवारी नळदुर्ग पाेलिस ठाण्यात बाप - लेकाविरूद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.नळदुर्ग येथील बसस्थानकाजवळ असलेल्या शिवराज हाॅटेलमध्ये मंगळवारी रात्री मयत सूर्यकांत उर्फ पप्पू सुरवसे (ह. मु. पनवेल) व आराेपी जयकुमार गाेरख गायकवाड (४८, रा. बाैध्दनगर, नळदुर्ग) हे वेगवेगळ्या ठिकाणी बसले हाेते. या दाेघांमध्ये नजरानजर झाली असता, रागाने का पाहिले? असे म्हणत एकमेकांना शिवीगाळ सुरू केली. वाद वाढल्यानंतर या दाेघांनाही हाॅटलच्या चालकाने बाहेर पाठविले अन् वाद आणखी विकाेपाला गेला. याचवेळी आराेपी जयकुमार गायकवाड याने भांडणाची माहिती मुलगा साेहन जयकुमार गायकवाड (२२, रा. बाैध्दनगर, नळदुर्ग) यास दिली. हाती काेयता घेऊन अवघ्या काही क्षणातच ताे तिथे दाखल झाला. ‘‘माझ्या वडिलांना मारताेस काय?’’, असे म्हणत सूर्यकांत उर्फ पप्पू सुरवसे यांच्या मानेवार धारदार काेयत्याने वार केला. जमिनीवर काेसळल्यानंरही सपासप वार केल्याने ते रक्ताच्या थाराेळ्यात पडले व प्राणज्याेत मालवली. 

एका आरोपीस अटकसामाजिक कार्यकर्ते म्हणून मयत सूर्यकांत यांची नळदुर्गसह परिसरात ओळख हाेती. दरम्यान, याप्रकरणी मयताची पत्नी करूणा सूर्यकांत सुरवसे (४२) यांनी बुधवारी नळदुर्ग पाेलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून जयकुमार गाेरख गायकवाड (४८) व साेहन जयकुमार गायकवाड (२२, दाेघे रा. बाैद्धनगर, नळदुर्ग) यांच्याविरूद्ध फिर्याद दाखल करण्यात आली. त्यावरून या बाप-लेकाविरूद्ध खुनाचा गुन्हा नाेंदविण्यात आला आहे. घटनेनंतर अवघ्या काही क्षणात पाेलिसांनी आराेपी साेहन गायकवाड यास अटक केली, तर जयकुमार गायकवाड याच्यावर साेलापूर येथे उपचार सुरू आहेत.

टॅग्स :dharashivधाराशिवCrime Newsगुन्हेगारी