शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

'झोपा काढो आंदोलन'; उमरग्यात रस्त्याच्या कामासाठी आंदोलक झोपले रस्त्यावर 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2020 14:45 IST

पालिका प्रशासनाने शहरातील पतंगे रस्त्याच्या महामार्गापासून ते बसवेश्वर विद्यालयपर्यंत काम करण्याचे आश्वासन दिले होते

ठळक मुद्देकंत्राटदारास कार्यारंभ आदेश देऊन आठ महिने झाले तरी काम सुरू झालेले नाही.या रस्त्याची स्थिती अत्यंत खराब झाल्यामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे.

उमरगा (उस्मानाबाद ) : शहरातील पतंगे रस्त्याच्या डांबरीकरण कामाचा कार्यारंभ आदेश आठ महिन्यापूर्वी देऊनही संबंधित ठेकेदार,पालिका प्रशासनाकडून दिरंगाई होत आहे.  यामुळे नागरिकांनी पतंगेरोड समितीतर्फे सोमवारी ( दि. १७ ) सकाळी रस्त्यावर झोपून अनोखे 'झोप काढो' आंदोलन करण्यात येत आहे. 

यासंदर्भात संघर्ष समितीने तहसीलदारांना गुरुवार दिनांक 13 रोजी दिलेल्या निवेदनात असे म्हटले होते की, पालिका प्रशासनाने शहरातील पतंगे रस्त्याच्या महामार्गापासून ते बसवेश्वर विद्यालयपर्यंत काम करण्याचे आश्वासन दिले होते त्यावेळी महामार्ग ते  एल.डी.औरादकर यांच्या घरापर्यंत पाचशे मीटर लांबीचे डांबरीकरण करण्याचे काम मंजूर केले होते या कामाची निविदा प्रक्रिया पूर्ण होऊन पात्र कंत्राटदारास कार्यारंभ आदेश देऊन आठ महिने झाले तरी काम सुरू झालेले नाही. या रस्त्याची स्थिती अत्यंत खराब झाल्यामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. यामुळे अपघात होत आहे याबाबत अनेकदा तक्रार देऊनही पालिका प्रशासनाने दखल न घेतल्याने नागरिकांनी 28 नोव्हेंबरला पालिकेवर हलगी मोर्चा आंदोलन केले होते. 

यावेळी पालिकेचे मुख्याधिकारी यांनी संबंधित ठेकेदारास नोटीस दिली त्यानंतर ठेकेदाराने रस्त्यासाठी दगड आणून टाकले मात्र होणारे काम एल.डी.औरादकर यांच्या घरापर्यंतच होईल तेवढ्याच कामासाठी दलितेतर निधीतून 42 लाख मंजूर असल्याची बाब नागरिकांनी प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिली या रस्त्याला दोन पुलासाठी दलित वस्ती निधीतुन कामाचा प्रस्ताव मंजूर नसल्याचे सांगण्यात आले होते. संपूर्ण काम एप्रिल महिन्यापर्यंत करण्याचे लेखी पत्र नगराध्यक्ष प्रेमलता टोपगे यांनी दिल्यानंतर आंदोलन तूर्त मागे घेण्यात आले होते. त्याला दोन महिने झाले तरी पालिकेकडून कामाबाबतच्या हालचाली गतीने केल्या जात नसल्याने पतंगे रोड रहिवाशी संघर्ष समितीच्या वतीने सोमवारी दि.17 रोजी पतंगे रस्त्यावर झोपा काढो आंदोलन सुरू केले आहे. समितीचे अध्यक्ष मनोज कुमार जाधव,उपाध्यक्ष सुनील औरादकर,सचिव आर.सी.पाटील,माजी नगरसेवक दत्ता रोंगे,प्राध्यापक सुग्राव बेंबळगे,सुशील दळगडे,प्रभाकर सगर,अमर देशटवार,विवेकानंद माळी आदीसह शेकडो नागरिक पतंगे रस्त्यावर झोप काढो आंदोलनात सहभागी झाले आहेत.

टॅग्स :agitationआंदोलनOsmanabadउस्मानाबादroad safetyरस्ते सुरक्षा