नियमित अभ्यासक्रमासाेबत कुलागुणांना दिला जाताेय आकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 3, 2021 04:32 AM2021-01-03T04:32:09+5:302021-01-03T04:32:09+5:30

बालाजी आडसूळ कळंब - ग्रामीण भागातील जिल्हा परिषदेच्या शाळेतील कष्टकऱ्यांची लेकरं वाढत्या स्पर्धेत टिकतील इतपत गुणात्मकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी काही ...

Size given to Kulagunas along with regular course | नियमित अभ्यासक्रमासाेबत कुलागुणांना दिला जाताेय आकार

नियमित अभ्यासक्रमासाेबत कुलागुणांना दिला जाताेय आकार

googlenewsNext

बालाजी आडसूळ

कळंब - ग्रामीण भागातील जिल्हा परिषदेच्या शाळेतील कष्टकऱ्यांची लेकरं वाढत्या स्पर्धेत टिकतील इतपत गुणात्मकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी काही शिक्षिका प्रयत्नशील आहेत. बाभळगाव येथील सहशिक्षिका सुषमा मसे या यापैकीच एक. क्रांतिज्योती सावित्रीबाईंचा वारसा चालवणाऱ्या शिक्षिका मसे विशेष प्रयत्नातून या शाळेतील विद्यार्थी जिल्हा, राज्यस्तरावर डंका वाजवत असल्याचे दिसून येत आहे.

ग्रामीण भागात खाजगी इंग्रजी शाळांचा समांतर असा बोलबाला वाढत असला तरी गरिबांच्या लेकरांना हे शिक्षण परवडणारे नसते. यामुळे कष्टकऱ्यांची लेकरं जि.प.च्या शाळातच ज्ञानाचे धडे गिरविण्यावर भर देतात.

काळाच्या ओघात ही जि. प. ची ज्ञानमंदिरेही कात टाकत आहेत. काही उपक्रमशील सहशिक्षक, सहशिक्षिका आपल्या शाळेतील विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा व त्यांनी वाढत्या स्पर्धेत टिकावे यासाठी विविध उपक्रम राबवत आहेत. तालुक्यातील बाभळगाव येथील जि. प. प्राथमिक शाळेत कार्यरत असलेल्या सुषमा श्रीकांत मसे या यापैकीच एक सहशिक्षिका. आद्यशिक्षिका क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचा वारसा प्रामाणिकपणे चालवत कष्टकऱ्यांच्या लेकरांना गुणवंत, ज्ञानवंत ठरविण्यासाठी विशेष उपक्रम राबवणाऱ्या. त्यांच्या नियोजनात नियमित अभ्यासक्रमाचे ‘अध्यापन’ तर असतेच, शिवाय विविध सहशालेय उपक्रमांचे नियोजन केलेले असते. यात स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन वर्ग, चित्रकला असा विविध घटकांवर भर देण्याचा त्यांचा सातत्याने प्रयत्न असतो. मनोरंजनात्मक, ज्ञानरचनावादी अध्यापन करत शाळेत बालआनंद मेळा, चित्रकला स्पर्धा, कवायत, वृक्षसंवर्धन व त्यांचे वाढदिवस, विज्ञान जत्रा, पाककला, महिला मेळावा, ई-लर्निंग व मोबाईलचा वापर करत ऑनलाईन शिक्षण देणे, आनंद बाजार, परसबाग, भाजीपाला लागवड आदी उपक्रमात सहशिक्षका सुषमा मसे यांचा विशेष सहभाग असतो.

चौकट...

स्पर्धा परीक्षा, दररोज मार्गदर्शन

बाभळगाव शाळेतील सहशिक्षिका सुषमा मसे या नवोदय, शिष्यवृत्ती, मंथन, एनएमएमएस यासारख्या विविध स्पर्धात्मक परीक्षेसाठी शाळेत दररोज विशेष तास घेतात. जादा तासिका, सराव परीक्षा, घटकाधरित सराव परीक्षा, पाठांतर व उजळणी याचा गुणवत्तावाढीसाठी विशेष उपयोग करतात. यामुळेच २०१८ - १९ मध्ये पाचवीचे ८ विद्यार्थी शिष्यवृत्तीधारक तर १३ विद्यार्थी पात्र ठरले. याचवर्षी दोन विद्यार्थी नवोदयधारक झाले. २०१९-२० मध्ये ६ शिष्यवृत्तीधारक तर ३ नवोदयधारक झाले. शिष्यवृत्तीमध्ये एकाने तालुकास्तरावर प्रथम तर एकाने राज्यात तिसरा क्रमांकही पटकावला.

चित्रकलेतून कल्पकतेला वाव...

सुषमा मसे या शैक्षणिक अभ्यासक्रम, स्पर्धात्मक परीक्षा, विविध शालेय उपक्रम यातून विद्यार्थ्यांचा विकास करण्याचा प्रयत्न करत आहेत. शिवाय विद्यार्थ्यांना चित्रकलेत पारंगत करण्यासाठी प्रयत्नशील राहतात. यामुळेच विद्यार्थ्यांच्या हातून नवनवीन कलाकृती आकाराला येत आहेत. सहावी ते आठवीच्या एलिमेंटरी चित्रकला परीक्षेस बसलेले सर्व ४६ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. याशिवाय एका शासकीय स्पर्धेत मसे यांनी मार्गदर्शन केलेला एक विद्यार्थी जिल्हास्तरावर प्रावीण्य मिळवणारा ठरला आहे.

Web Title: Size given to Kulagunas along with regular course

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.