शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानींसमोरील समस्या वाढल्या; ३००० कोटींची मालमत्ता जप्त, फ्लॅट, प्लॉट आणि ऑफिसचा समावेश, काय आहे प्रकरण?
2
दीड ते दाेन लाखांनी घरे हाेणार स्वस्त? सिडकाे घरांच्या किमती कमी करण्यासाठी आज बैठक
3
भारताने इतिहास घडवला! महिलांनी केवळ विश्वचषक नव्हे, तर भारतीयांचे हर'मन' ही जिंकले !
4
वर्ल्डकपच्या संघातही नव्हती, ऐनवेळी संधी मिळाली अन्..., शेफाली वर्मा अशी ठरली मॅचविनर
5
स्वप्न साकार! भारतीय महिलांनी क्रिकेट वर्ल्डकप जिंकताच बॉलिवूड कलाकारांकडून अभिनंदनाचा वर्षाव
6
‘जेएनपीए-वैतरणा’वर मालगाडी गेली निर्धाेक; 'डेडिकेटेड फ्रेट कॉरिडोर'अंतर्गत महत्त्वाचे पाऊल
7
१९८३ चा क्षण महिला संघाने जिवंत केला! सचिन तेंडुलकरकडून टीम इंडियाचे कौतुक करत 'प्रेरणादायी' पोस्ट
8
आजचे राशीभविष्य,०३ नोव्हेंबर २०२५: इतरांचे भले करण्याच्या नादात संकटे येतील; पदोन्नती, व्यापारी सौदे यशस्वी
9
आता रिक्षा, टॅक्सी, बससाठी लागेल स्वतंत्र पार्किंग; राज्य परिवहन विभागाचे नवे धोरण
10
विशेष लेख: दुबार मतदार, मतचोरी आरोपावर भाजप नेते बोलतात, निवडणूक आयोग का बोलत नाही..?
11
'बाहुबली'ने उचलला ४,४१० किलोचा भार, सर्वात जड उपग्रहाला पाठवले अवकाशात
12
मंत्री बंगल्यावरील कामात कोट्यवधीच्या भ्रष्टाचारावर माेहाेर; चौकशीत अभियंते दोषी
13
लेख: एकीकडे शांततेच्या गप्पा, दुसरीकडे अणुबॉम्ब परीक्षण! डोनाल्ड ट्रम्प यांचा खरा चेहरा उघड
14
‘परिवहन’ची मंजुरी इलेक्ट्रिकला अन् सुसाट धावतात पेट्रोल बाइक टॅक्सी; कारवाईला ठेंगा
15
अग्रलेख: ‘सत्या’च्या मोर्चात ‘महा-मनसे’! मविआ + राज ठाकरे : शक्तिप्रदर्शन अर्थातच मोठे !!
16
महापौर आमचाच होऊ दे; उद्धव ठाकरे यांचे महोत्सवात देवाला गाऱ्हाणे; कार्यकर्त्यांना सल्ला
17
पॅलेस्टाइन-इस्रायल युद्धाच्या झळांनी होरपळलेले नागरिक आणि ‘कलिंगड’ आइस्क्रीम!
18
कोस्टल रोड वाहतुकीसाठी २४ तास खुला; पण अंधारातून प्रवास असल्याने अपघाताचा धोका वाढला !
19
बांगलादेशींच्या मुद्द्यावरून आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी; पालिका निवडणुकीमुळे वातावरण तप्त
20
विशेष लेख: शेतकऱ्यांना कर्जमुक्ती नाही, तर आम्ही थांबणार नाही; हा एल्गार थांबणार नाही..!!

धक्कादायक ; दिव्यांगांच्या ऑनलाईन प्रमाणपत्रातही हेराफेरी !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 2, 2020 18:24 IST

प्रमाणपत्र महिलेच्या नावे, बारकोडमध्ये ८२ वर्षीय वृद्धाचा ‘डाटा’

ठळक मुद्देबनवेगिरी ‘बारकोड’च्या स्कॅनिंगनंतर समोर आली.दिव्यांगांच्या नावाखाली अनेकांनी बनावट प्रमाणपत्रे काढली आहेत.

- बाबूराव चव्हाण

उस्मानाबाद : दिव्यांगत्वाच्या हस्तलिखित प्रमाणपत्रामध्ये हेराफेरी करून शासनाला चुना लावला जात होता. त्यामुळे खऱ्या दिव्यांगांना शासनाच्या योजनांना मुकावे लागत होते. हीच बाब लक्षात घेऊन शासनाने हस्तलिखित ऐवजी आॅनलाईन प्रमाणपत्र देण्याबाबत आदेशित केले. परंतु, पुढारलेल्या तंत्रज्ञानाचा वापर करून आॅनलाईन प्रमाणपत्रातही हेराफेरी करण्यात येत असल्याचा धक्कादायक प्रकार उजेडात आला आहे. ८२ ते ८३ वर्षीय वृद्धाच्या मूळ प्रमाणपत्रावर हेराफेरी करून त्यावर एका महिलेचे नाव लावण्यात आले आहे. ही बनवेगिरी ‘बारकोड’च्या स्कॅनिंगनंतर समोर आली.

दिव्यांग व्यक्तींना स्वाभिमानाने जगता यावे. अपंगत्वामुळे कोणासमोरही झुकण्याची वेळ येऊ नये, यासाठी केंद्र तसेच राज्य शासनाकडून वेगवेगळ्या योजना राबविण्यात येत आहेत. एसटी महामंडळाच्या प्रवासी भाडे सवलतीपासून ते त्यास उद्योग-व्यवसायासाठी अर्थसहाय्य केले जाते. त्यामुळे आजघडीला अनेक दिव्यांगांना आर्थिक स्थैर्य येऊ लागले आहे. दरम्यान, शासनाच्या योजनांचा लाभ घेण्यासाठी संबंधिताकडे पुराव्याखातर दिव्यांगत्वाचे प्रमाणपत्र बंधनकारक आहे. ही प्रमाणपत्रे जिल्हा शल्यचिकित्सक यांच्या मार्फत दिली जातात. यासाठी स्वतंत्र कमिटी निर्माण करण्यात आली आहे. या कमिटीकडून पूर्वी हस्तलिखित प्रमाणपत्र दिली जात होती. परंतु, यामध्ये बनवेगिरी घुसली. डॉक्टरांसह संबंधित अधिकाऱ्याच्या बनावट स्वाक्षऱ्या व शिक्के मारून धडधाकट व्यक्तींना प्रमाणपत्र दिली जात होती. अशा बनवेगिरीमुळे एकीकडे शासनाचे आर्थिक नुकसान होते. तर दुसरीकडे खरोखर दिव्यांग असलेल्या व्यक्तींवर अन्याय होत असे.

याबाबतीत दिव्यांग संघटनांकडून सातत्याने तक्रारी झाल्यानंतर शासनाने प्रमाणपत्र देण्याची पद्धत अन् स्वरूपही बदलले. हस्तलिखित ऐवजी आॅनलाईन प्रमाणपत्र वितरणाबाबत आदेश काढले. थोडाही विलंब न लावता, आदेशाची अंमलबजावणी सुरू केली. प्रमाणपत्रावर बारकोड असल्यामुळे बोगसगिरीला आळा बसेल, असा दावाही प्रशासनाकडून करण्यात आला होता. परंतु, याही प्रमाणपत्रामध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने हेराफेरी करण्यात येत असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. दिव्यांगांकडील विविध योजनांची प्रमाणपत्रे ‘रिनिव्हल’ करण्याचे काम सध्या समाजकल्याण विभागाकडून सुरू आहे. याच दरम्यान, आॅनलाईन काढण्यात आलेलने प्रमाणपत्र बनावट असल्याचे आढळून आले आहे. एका महिलेकडून हे प्रमाणपत्र सादर करण्यात आले आहे. त्यावर महिलेचा फोटो, सिव्हिल सर्जन यांची सही, शिक्का आदी बाबी आहेत. परंतु, बारकोडचे स्कॅनिंग केले असता, मूळ प्रमाणपत्र एका ८३ वर्षीय वृद्धाच्या नावे असल्याचे स्पष्ट झाले. सिव्हिल सर्जनकडून हे प्रमाणपत्र मे २०१९ मध्ये वितरित झाले आहे. त्यामुळे हेराफेरीत कोणाचा हात आहे? हे प्रमाणपत्र कोठून काढले? हेराफेरी कोणत्या सेंटरवर झाली? आदी बाबींच्या अनुषंगाने समाजकल्याण विभागाकडून चौकशी हाती घेण्यात आली. याच कालावधीतील इतर प्रमाणपत्रांवरील नावे व बारकडेमधील डाटा व्हेरिफाय करण्याचे काम सध्या सुरू आहे.

हस्तलिखित प्रमाणपत्रांचा खच...दिव्यांगांच्या नावाखाली अनेकांनी बनावट प्रमाणपत्रे काढली आहेत. सिव्हिल सर्जनसह अन्य अधिकाऱ्यांच्या हुबेहुब स्वाक्षऱ्याही करण्यात आल्या आहेत. परंतु, समाजकल्याण विभागाकडे असलेल्या प्रमाणपत्रांच्या क्रमांकावरून ही बनवेगिरी आता उजेडात येऊ लागली आहे. बनावट प्रमाणपत्र देणाऱ्या टोळीने मोठी शक्कल लढविली आहे. दिव्यांग विद्यार्थ्यांच्या क्रमांकाचा आधार घेत प्रमाणपत्र काढली आहेत. समाजकल्याण विभागाच्या रजिस्टरवर दिव्यांग  विद्यार्थ्याला ज्या क्रमांकाचे प्रमाणपत्र दिले आहे. त्याच क्रमांकाने दुसरे प्रमाणपत्र वृद्धाला देण्यात आले आहे. रजिस्टरवरील सदरील क्रमांक बोगसगिरी करणाऱ्यांकडे गेले कसे? असा प्रश्नही आता उपस्थित होऊ लागला आहे.

२०१४ मधील सर्वाधिक प्रकरणे...बनावट प्रमाणपत्र आल्यानंतर समाजकल्याण विभागाकडून ती जप्त करण्यात आली आहेत. आजवर दीडशेवर प्रमाणपत्र फाडून टाकली आहेत. यापैैकी जवळपास ८० टक्के प्रमाणपत्रे ही २०१४ मध्ये वितरित झाली असल्याचे प्राथमिक चौकशीतून समोर आले आहे. त्यामुळे बनावट प्रमाणपत्र देणाऱ्या टोळीचा शोध घेण्यासाठी प्रशासनाकडून आवश्यक माहिती संकलित करण्यात येत असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले.

लाभार्थ्यांनी रितसर प्रमाणपत्रे काढावितखरोखर दिव्यांग असलेल्या लाभार्थ्यांना प्रमाणपत्र वितरित करण्याची प्रक्रिया सुलभ करण्यात आली आहे. त्यामुळे लाभार्थ्यांनी कुठलीही खाजगी व्यक्ती वा एजन्टाच्या माध्यमातून अशी प्रमाणपत्रे काढू नयेत. शासनाने मंजुरी दिलेल्या सेंटरमधूनच प्रमाणपत्र काढावित, असे आवाहन जिल्हा परिषद समाजकल्याण अधिकारी चौगुले यांनी केले आहे.

टॅग्स :Osmanabadउस्मानाबादDivyangदिव्यांगhospitalहॉस्पिटलdoctorडॉक्टर