शहरं
Join us  
Trending Stories
1
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
2
'रशियन तेल खरेदी थांबवा अन्यथा...',अमेरिकन मंत्री हॉवर्ड लुटनिकची भारताला पुन्हा धमकी
3
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
4
'लष्करी शक्तीच्या जोरावर पाच पट मोठ्या भारताला...', पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनी पुन्हा गरळ ओकली
5
खासदार प्रशांत पडोळे अपघातातून थोडक्यात बचावले ; नक्षलग्रस्त भागात शासकीय सुरक्षा व्यवस्था न दिल्याचा मुद्दा चर्चेत
6
Asia Cup 2025 : बाबरनं षटकार मारत रुबाब झाडला! पण दुसऱ्याच चेंडूवर गोलंदाजानं असा घेतला बदला (VIDEO)
7
शाळेच्या वेळेत मुले गावभर फिरले, गावकरी शाळेत जाऊन पाहतात तर काय? विद्येच्या मंदिरात नशेचा नंगा नाच !
8
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
9
दुपारी आनंदानं बहिणीशी बोलली अन् संध्याकाळी सगळं संपवलं! जळगावच्या नवविवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल
10
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
11
आप खासदार संजय सिंह जम्मू-काश्मीरमध्ये नजरकैदेत; अरविंद केजरीवालांचा भाजपवर निशाणा...
12
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
13
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
14
जिंकलंस भावा! जवानाने आई-वडिलांचा 'असा' केला मोठा सन्मान; Video पाहून म्हणाल 'एक नंबर'
15
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन
16
सीपी राधाकृष्णन यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा, आता गुजरातच्या राज्यपालांकडे जबाबदारी
17
बुध गोचर २०२५: १५ सप्टेंबरपासून 'या' ५ राशींचे उजळणार भाग्य; बुध गोचर, भद्रा राजयोगात लाभाच्या संधी
18
ना लग्न, ना पार्टनर, तरी आई बनली ही भारतीय गायिका, घेतला धाडसी निर्णय, कोण आहे ती?
19
राज्यातील या शहरात सुरु झाली अ‍ॅमेझॉन नाऊ सर्व्हिस; १० मिनिटांत वस्तू पोहोचविणार...
20
९ मुलं, २ सुना अन् ३२ वर्षांचा भरला संसार! सगळं क्षणात सोडून प्रियकरासोबत पसार झाली महिला

शिवराज्याभिषेक सोहळ्यात 'रयतेचा सन्मान', आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबीयास पूजेचा मान

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 6, 2019 20:56 IST

रायगडावरील शिवराज्याभिषेक सोहळ्याला रयतेच्या प्रातिनिधिक स्वरूपात उस्मानाबादमधील मेडशिंगा येथील आत्महत्या केलेल्या अवचार या शेतक-यांच्या कुटूंबाला उपस्थित राहण्याची संधी दिली.

उस्मानाबाद - छत्रपती शिवाजी महाराजांचा ३४५ वा राज्याभिषेक सोहळा मोठ्या दिमाखात पार पडला. मात्र, यंदाच्या सोहळ्याचे वैशिष्ट्य म्हणजे राज्याभिषेक सोहळ्यात महाराजांच्या मूर्तीवर अभिषेक करीत असताना युवराज संभाजीराजे व युवराजकुमार शहाजीराजेंसोबत राजसदरेवर बसण्याचा बहुमान एका शेतकरी कुटुंबाला देण्यात आला होता. उस्मानाबाद जिल्ह्यातील आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याची पत्नी आणि वडिलांना राज्याभिषेकावेळी राजसदरेवर बसविण्यात आले होते. रयतेच्या राजाच्या राज्याभिषेकाचा मान रयतेला मिळाला पाहिजे, असे म्हणत छत्रपती संभाजीराजे यांनी शेतकरी कुटुंबाला हा सन्मान दिला. 

रायगडावरीलशिवराज्याभिषेक सोहळ्याला रयतेच्या प्रातिनिधिक स्वरूपात उस्मानाबादमधील मेडशिंगा येथील आत्महत्या केलेल्या अवचार या शेतक-यांच्या कुटूंबाला उपस्थित राहण्याची संधी दिली. या शेतकरी कुटूंबियाच्या हस्ते पूजनही झाले. तसेच, त्यांना एक लाख रुपयांचा धनादेश मदत म्हणून देण्यात आला. पंढरपूरच्या पांडुरंगाच्या दर्शनावेळी मानाच्या वारकरी दाम्पत्याचा सन्मान केला जातो. त्याचप्रमाणे, यंदा शिवराज्याभिषेक सोहळ्यावेळी शेतकरी कुटुंबीयाचा सन्मान करण्यात आला. लक्ष्मण अवचार यांनी नापिकी, दुष्काळीस्थिती आणि कर्जबाजारीपणामुळे 19 मे 2015 रोजी गळफास घेऊन आत्महत्या केली. त्यांच्या पश्चात आई-वडिल, पत्नी, एक मुलगा आणि एक मुलगी असा परिवार आहे. वयाच्या 25 व्या वर्षी लक्ष्मण यांनी आपली जीवनयात्रा संपवली. त्यांच्या जाण्याने अवचार कुटंबियांवर मोठे संकट उभारले. तर, वडिल गणपती, आई चिवाबाई, पत्नी रेश्मा यांना मोलमजुरी करुन उदरनिर्वाह करावा लागत आहे. त्यामुळेच, छत्रपती संभाजी महाराजांनी विशेष निमंत्रण देऊन या शेतकरी कुटुंबीयास शिवराज्याभिषेकावेळी राजसदरेवर बसण्याचा बहुमान दिला. रयतेच्या हस्ते राज्याभिषेक झाल्याने हा सोहळा खऱ्या अर्थाने रयतेचा सोहळा ठरेल, असे छत्रपती संभजीराजे यांनी म्हटले होते. त्यानुसार, अवचार कुटुंबीयांच्या हस्ते पूजन करण्यात आले. 

शिवाजी महाराजांचे राज्य विश्ववंदनीय होते. त्यांची नीतिमत्ता, राजकारभाराच्या नीतिवर राज्य सरकारने अमल करण्याची गरज आहे, असे खासदार संभाजीराजे यांनी केले. यावेळी मराठा आरक्षण दिले पाहिजे, असेही आवाहन संभाजीराजे यांनी केले. शिवरायांच्या जयघोषांत अखिल भारतीय शिवराज्याभिषेक महोत्सव समितीच्यावतीने ३४५ वा राज्याभिषेक सोहळा गुरुवारी रायगड येथे पार पडला. यावेळी हजारों शिवप्रेमीच्या उपस्थितीत खासदार संभाजीराजेनी राजसदरेवरून शिवप्रेमींना संबोधित केले. यावेळी चीनचे राजदूत लीयू बिन्ग, पोलंडचे राजदूत दमियन इरज्याक, सचिव इवा स्टेन्किइव्हीक्झ, तुनिसियाचे राजदूत नेज्मेद्दिन लखाल, बुलग्रीयाचे राजदूत इलेनोरा दिम्तीवा, पालकमंत्री रवींद्र चव्हाण, आमदार अनिकेत तटकरे, जिल्हाधिकारी अनिल पारस्कर, तहसीलदार चंद्रसेन पवार, कोल्हापुरचे माजी आयुक्त प्रभाकर देशमुख उपस्थित होते. 

टॅग्स :Shivaji Maharajछत्रपती शिवाजी महाराजRaigadरायगडSambhaji Raje Chhatrapatiसंभाजी राजे छत्रपतीShivrajyabhishekशिवराज्याभिषेकFarmerशेतकरी