मुळजमधील शिवपार्वती विवाह सोहळा साधेपणाने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 21, 2021 04:32 AM2021-04-21T04:32:44+5:302021-04-21T04:32:44+5:30

उमरगा : तालुक्यातील मुळज येथील ग्रामदैवत श्री जटाशंकर देवस्थानच्या यात्रेनिमित्त मंगळवारी कोरोना पार्श्वभूमीवर मोजक्याच भाविक आणि वऱ्हाडीच्या उपस्थितीत सकाळी ...

Shivparvati wedding ceremony in Mulaj simply | मुळजमधील शिवपार्वती विवाह सोहळा साधेपणाने

मुळजमधील शिवपार्वती विवाह सोहळा साधेपणाने

googlenewsNext

उमरगा : तालुक्यातील मुळज येथील ग्रामदैवत श्री जटाशंकर देवस्थानच्या यात्रेनिमित्त मंगळवारी कोरोना पार्श्वभूमीवर मोजक्याच भाविक आणि वऱ्हाडीच्या उपस्थितीत सकाळी साडेअकरा वाजता शिव-पार्वती लग्न सोहळा विधिवत पार पडला.

महाराष्ट्राच्या सीमेवर लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेले मुळज गावातील प्राचीन, उत्कृष्ट शिल्पकलेचा उत्तम नमुना असलेले ग्रामदैवत श्री जटाशंकराचे हेमाडपंथी मंदिर आहे. शिखर शिंगणापूरनंतर सर्वात मोठ्या प्रमाणात जटाशंकर देवस्थान येथे प्रतिवर्षी शिव-पार्वती विवाह सोहळा साजरा करण्याची परंपरा आहे. श्री जटाशंकर देवस्थानच्या या धार्मिक सोहळ्याचे वैशिष्ट्य म्हणजे यात मान-पान, आहेर स्वीकारला जात नाही. शिवाय कसल्याही प्रकारचे निमंत्रण दिले जात नाही.

दरम्यान, यंदा कोरोना प्रादुर्भावामुळे चैत्र शुद्ध अष्टमीला होणारा विवाह सोहळा मोजक्या भाविकांच्या उपस्थितीत पार पडला. यावेळी विधिवत पूजा, वेदमंत्रोच्चार, पाच मंगलाष्टका म्हणून संतोष व स्नेहा पाठक दाम्पत्याने पार्वतीचे जटाशंकराला कन्यादान केल्यावर उपस्थित भाविकांनी अक्षता टाकल्या. यावेळी वेदमूर्ती अशोक जोशी, केतन जोशी यांनी पौरोहित्य केले. यावेळी देवस्थानच्या काठीचे मानकरी तानाजीराव बिराजदार, व्यंकटराव बिराजदार, सतीश जाधव, सदाशिव पाटील, रघुनाथ मुळजे, संतोष जोशी, देवीदास चव्हाण, महिला अन् पुरुष वऱ्हाडी सहभागी झाले होते.

Web Title: Shivparvati wedding ceremony in Mulaj simply

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.