शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

तुळजाभवानी देवीची सिंहासनावर पूर्ववत प्रतिष्ठापना; घटस्थापनेने नवरात्रोत्सव प्रारंभ!

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 3, 2024 19:12 IST

श्री तुळजाभवानी देवीची घोरनिद्रा संपून गुरुवारी रात्री दीडच्या सुमारास भोपी पुजाऱ्यांनी देवीची सिंहासनावर पूर्ववत प्रतिष्ठापना केली.

तुळजापूर (जि. धाराशिव) : महाराष्ट्राची कुलस्वामिनी श्री तुळजाभवानी देवीच्या शारदीय नवरात्र उत्सवास गुरुवारी घटस्थापनेने माेठ्या उत्साहात सुरुवात झाली. मंदिर संस्थानचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओंबासे व पत्नी अस्मिता यांच्या हस्ते दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास पारंपरिक पद्धतीने घटस्थापना करण्यात आली.

श्री तुळजाभवानी देवीची घोरनिद्रा संपून गुरुवारी रात्री दीडच्या सुमारास भोपी पुजाऱ्यांनी देवीची सिंहासनावर पूर्ववत प्रतिष्ठापना केली. यानंतर पारंपरिक धार्मिक विधी होऊन विशेष पंचामृत अभिषेक पूजा झाली असता भाविकांना देवी दर्शनास सोडण्यात आले. सकाळी सहा वाजता देवीची अभिषेक घाट होऊन नित्योपचार पंचामृत अभिषेक पार पडले. यानंतर महंत व भोपे पुजाऱ्यांनी देवीला नैवेद्य दाखवून धुपारती व अंगारा हे विधी पार पडले. यानंतर तुळजाभवानीची विशेष अलंकार पूजा बांधण्यात आली.

दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास संस्थानचे अध्यक्ष जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओंबासे यांनी तुळजाभवानीची शासकीय आरती करून गोमुख तीर्थाजवळील घटकलशाची विधिवत पूजा करून सवाद्य मंदिरात आणले. सिंह गाभाऱ्यात ठेवण्यात आलेल्या वावरीत घटकलश ठेवून पारंपरिक पद्धतीने त्याचे पूजन झाल्यानंतर घटस्थापना करण्यात आली. पुढील आठ दिवस चालणाऱ्या विविध धार्मिक विधींसाठी ब्राह्मण वृंदास ओंबासे दाम्पत्याच्या हस्ते वर्णी देण्यात आली. यावेळी उपस्थित पुजारी सेवेकरी व भाविकांनी आई राजा उदे-उदेचा जयघोष केला. या साेहळ्यानंतर मंदिरातील उपदेवतांच्या ठिकाणी घटस्थापना केली.

याप्रसंगी देवीचे महंत, भोपे पुजारी अतुल मलबा, शासकीय उपाध्ये बंडोपंत पाठक, विश्वस्त तथा आमदार राणा जगजितसिंह पाटील, व्यवस्थापक तहसीलदार माया माने, धार्मिक व्यवस्थापक इंतुले, विश्वास कदम, पोलिस उपविभागीय अधिकारी डॉ. नीलेश देशमुख, भोपे पुजारी मंडळाचे अध्यक्ष अमरराजे परमेश्वर, पाळीकर पुजारी मंडळाचे अध्यक्ष बिपीन शिंदे, सज्जनराव साळुंके, उपाध्ये मंडळाचे अध्यक्ष अनंत कोंडो, मकरंद प्रयाग, घटाच्या धान्याचे मानकरी शेटे परिवार यांच्यासह कर्मचारी उपस्थित हाेते.

टॅग्स :Osmanabadउस्मानाबादNavratri Mahotsav 2024शारदीय नवरात्रोत्सव २०२४