(फोटो - सिद्राम देशमुख ०५)
लोकमत न्यूज नेटवर्क
गुंजोटी : येथील श्रीकृष्ण शिक्षण संस्थेच्या कार्यकारी मंडळातून पदाधिकाऱ्यांची बिनविरोध निवड करण्यात आली. यामध्ये संस्थेच्या अध्यक्षपदी विभावरी शाईवाले, उपाध्यक्षपदी प्रभाकर हिरवे, सचिवपदी डॉ. दामोदर पतंगे, सहसचिवपदी मंदाकिनीताई पाटील तर कोषाध्यक्षपदी डॉ. श्याम ईबत्ते यांची निवड करण्यात आली.
स्वातंत्रपूर्व १९२७ साली स्थापन झालेल्या या संस्थेची सर्वसाधारण वार्षिक सभा दिनांक २८ डिसेंबर रोजी घेण्यात आली. या सभेत सन २०२० ते २०२५ या पंचवार्षिक कार्यकारी मंडळावर विभावरी शाईवाले, प्रभाकर हिरवे, डॉ. दामोदर पतंगे, मंदाकिनीताई पाटील, डॉ. श्याम ईबत्ते, सुरेश देसाई, डॉ. सागर पतंगे, संगय्या स्वामी यांची विश्वस्त म्हणून बिनविरोध निवड करण्यात आली. संस्थेच्या घटनेनुसार पदसिद्ध विश्वस्त म्हणून प्राथमिकच्या मुख्याध्यापिका सुरेखा भोसले, मुख्याध्यापक शिवानंद बुदले तर शिक्षक प्रतिनिधी म्हणून इंग्रजी विषयतज्ज्ञ बालाजी घुले यांची निवड करण्यात आली.
यावेळी संस्थेतील सर्व विभागांच्यावतीने नवनिर्वाचित संस्था चालकांचा सत्कार करण्यात आला. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून आनंद पतंगे यांनी काम पाहिले. या सभेसाठी मुख्याध्यापक शि. ना. बुदले, प्रा. अभयकुमार हिरास, अविनाश राखेलकर, बालाजी पाटील, कुंभार आदींनी पुढाकार घेतला.
फोटो : गुंजोटी येथील श्रीकृष्ण शिक्षण संस्थेच्या नूतन संचालकांची बिनविरोध निवड झाल्याबद्दल संस्थेतील सर्व विभागांच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला.