मैला व्यवस्थापनाच्या टँकचे काम राेखले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 6, 2021 04:30 AM2021-03-06T04:30:49+5:302021-03-06T04:30:49+5:30

लोहारा : लोहारा नगरपंचायतकडून जुन्या गावातील कब्रस्थाननजीक मैला व्यवस्थापनाच्या टँकचे काम हाती घेण्यात आले हाेते. शुक्रवारी परिसरातील रहिवाशांनी हे ...

Sewage management tank work | मैला व्यवस्थापनाच्या टँकचे काम राेखले

मैला व्यवस्थापनाच्या टँकचे काम राेखले

googlenewsNext

लोहारा : लोहारा नगरपंचायतकडून जुन्या गावातील कब्रस्थाननजीक मैला व्यवस्थापनाच्या टँकचे काम हाती घेण्यात आले हाेते. शुक्रवारी परिसरातील रहिवाशांनी हे काम राेखले. पुन्हा सुरू केल्यास तीव्र आंदाेलन करण्यात येईल, असा इशाराही दिला. यासंदर्भातील निवेदन मुख्याधिकारी यांना देण्यात आले.

लोहारा नगरपंचायतच्या जुन्या गावातील गोडाऊन शेजारील खुल्या जागेत शहरातील गोळा केलेला ओला व सुका कचरा या ठिकाणी टाकण्यात येतो. याच्या लगतच मुस्लिम समाजाचे कब्रस्तान आहे. मयताला नागरिक गेले तर दुर्गंधी येते. यामुळे नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. त्यात नगरपंचायतकडून याच ठिकाणी मैला व्यवस्थापन टँकचे बांधकाम सुरू केले हाेते. ही माहिती मिळताच परिसरातील नागरिकांसह समाजबांधवांनी शुक्रवारी हे काम राेखले. पुन्हा सुरू केल्यास आंदाेलन करण्यात येईल, असा इशारा दिला. यानंतर मुख्याधिकारी यांना निवेदनही देण्यात आले. याप्रसंगी शब्बीर गवंडी, अमिन सुंबेकर, आयुब शेख, नजिर मुल्ला, ताहेर पठाण, अमिन कुरशी, रफिक शेख, इन्नुस पटेल, रियाज खडीवाले, इकबाल मुल्ला,प्रताप घोडके, दादा मुल्ला, श्याम नारायणकर, श्रीकांत भरारे, मल्लिकार्जुन पाटील, आयनोद्दीन सवार, रफिक सिध्दकी, आसिफ शेख, रफिक शेख आदींची उपस्थिती हाेती.

काेट...

लोहारा नगरपंचायतकडून जुन्या गावातील कब्रस्थानजवळ मैला व्यवस्थापनाच्या टँकचे काम सुरू आहे. ते चुकीच्या ठिकाणी करण्यात येत असून या कामाला आमचा विरोध राहणार आहे.

- प्रताप घोडके

उपनगराध्यक्ष,

नगरपंचायत ,लोहारा.

लोहारा नगरपंचायतकडून जुन्या गावातील कब्रस्थानजवळ मैला व्यवस्थापनाच्या टँकचे काम सुरू आहे. नागरिकांच्या तक्रारीनंतर काम थांबविण्यात आले आहे.

-हेमंत केरुरकर, प्रभारी मुख्यधिकारी, लोहारा.

फोटो ओळी... लोहारा नगरपंचायत कब्रस्थानजवळ मैला व्यवस्थापनाच्या टँकचे सुरू असलेले काम बंद पाडले. यावेळी शब्बीर गवंडी,चॉद डेड्डे, हैदर शेख, सलीम शेख, रफिक शेख, अमिन सुंबेकर, इन्नुस पटेल, रियाज खडीवाले आदी.

Web Title: Sewage management tank work

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.