परंडा : तालुक्यातील अनाळा येथील ग्रामपंचायत निवडणुकीत सेना-भाजपा पुरस्कृत परिवर्तन पॅनलने ९ पैकी ७ जागा जिंकल्या. सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत ग्रामविकास पॅनलला अवघ्या २ जागांवर समाधान मानावे लागले.
गेल्या २० वर्षांपासून अनाळा ग्रामपंचायतीवर राष्ट्रवादीची सत्ता होती. सेना-भाजपा युतीचे पॅनल प्रमुख ज्योतीराम क्षीरसागर यांचा अल्पशा मताने माजी सरपंच दत्तात्रय पाटील यांनी पराभव केल्याने सेना -भाजपा युतीची अवस्था ‘गड आला पण सिंह गेला’, अशी झाली. सेना-भाजपा पुरस्कृत परिवर्तन पॅनल प्रमुख ज्योतीराम क्षीरसागर यांच्या पत्नी अंबिका क्षीरसागर प्रभाग ३ मधून विक्रमी मताने विजयी झाल्या. सेना-भाजपा विजयी उमेदवारांमध्ये सुनीता शिंदे, स्वाती चव्हाण, कल्याण शिंदे, अर्चना कदम, दादासाहेब फराटे, अंबिका क्षीरसागर, अजित शिंदे तर राष्ट्रवादी पुरस्कृतमध्ये दत्तात्रय पाटील, सीमा अंकुश यांचा समावेश आहे.