नळदुर्गात सुरक्षा प्रबोधन चित्ररथ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 21, 2021 04:29 AM2021-01-21T04:29:29+5:302021-01-21T04:29:29+5:30

नळदुर्ग : रस्ता सुरक्षा अभियानाचे औचित्य साधून येथील महामार्ग पोलीस ठाण्याच्या वतीने महामार्ग सुरक्षा प्रबोधन चित्ररथाचे उद्घाटन सपोनि जगदीश ...

Security awareness chariot at Naldurg | नळदुर्गात सुरक्षा प्रबोधन चित्ररथ

नळदुर्गात सुरक्षा प्रबोधन चित्ररथ

googlenewsNext

नळदुर्ग : रस्ता सुरक्षा अभियानाचे औचित्य साधून येथील महामार्ग पोलीस ठाण्याच्या वतीने महामार्ग सुरक्षा प्रबोधन चित्ररथाचे उद्घाटन सपोनि जगदीश राऊत यांच्या हस्ते करण्यात आले. या माध्यमातून चालकांचे प्रबोधन केले जाणार आहे.

राज्यात १८ जानेवारी ते १७ फेब्रुवारी हा कार्यकाल ३२वा रस्ता सुरक्षा अभियान म्हणून साजरा करण्यात येत आहे. या काळात रस्त्यावरील अपघाताचे प्रमाण कमी करण्यासाठी नागरिक व चालकात जनजागृती करणे, हेल्मेटचा वापर, सीट बेल्ट वापरणे, ड्रंक ॲण्ड ड्राईव्हला प्रतिबंध, चुकीच्या मार्गाने वाहन चालविणे व वळण घेणे आदी बाबींचे चित्र रुपाने प्रदर्शन करण्यात येणार आहे. त्याचाच एक भाग म्हणून नळदुर्गमध्ये चित्ररथ तयार करून ते राष्ट्रीय महामार्ग ६५ व २५६ वर फिरविले जाणार आहेत. चित्ररथावर ध्वनीक्षेप, अपघातात दुर्दशा झालेले वाहन, विविध माहितीचे बॅच लावण्यात आले होते. अशा या वाहनाचे उद्घाटन सपोनि जगदीश राऊत यांनी केले. यावेळी महामार्गचे पोउपनि हनुमंत कवले, पोउनि सदानंद वाघमारे, अमोल नरवडे, जिवीशाचे पोना धनंजय वाघमारे, पोना जाधव यांच्यासह महामार्ग पोलीस ठाण्याचे कर्मचारी उपस्थित होते.

Web Title: Security awareness chariot at Naldurg

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.