उमरगा : शालेय जीवनात विद्यार्थ्यांचा कल हा अनुभवी शिक्षकांना समजत असतो. शालेय बोर्ड परीक्षेत ९० टक्क्यांच्या वर गुण घेणारे विद्यार्थी निश्चितच एमपीएससी स्पर्धा परीक्षेत पास होऊ शकतात; परंतु यासाठी शाळेनेही शालेय अभ्यासक्रमासोबत सहशालेय उपक्रम म्हणून स्पर्धा परीक्षेचे नियोजन करणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन माजी विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. विठ्ठलराव जाधव यांनी केले.
येथील शरणप्पा मलंग विद्यालयात श्री गणेश व्याख्यानमालेत ‘विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी स्पर्धा परीक्षा’ या विषयावर ते बोलत होते. अध्यक्षस्थानी शालेय शिक्षण समितीचे अध्यक्ष एस. के. मलंग, तर प्रमुख पाहुणे म्हणून शांतिदूत परिवाराच्या संस्थापिका विद्याताई जाधव, वीरशैव शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष डॉ. एम. एस. मलंग, सचिव सुरेखाताई मलंग, संस्थेचे ज्येष्ठ सदस्य विजयकुमार पाटील आदी उपस्थित होते.
विद्यार्थ्यांनी स्पर्धा परीक्षेबाबत मनात असलेली भीती दूर करून मोठा अधिकारी होण्याची स्वप्न पाहावीत. त्यासाठी काहीही करण्याची जिद्द, अभ्यासात सातत्य व प्रत्येक विषयातील गटाची शोध प्रतिमा निर्माण करावी, असे आवाहन जाधव यांनी केले. कार्यक्रमाला रेखाताई सूर्यवंशी, प्रा. युसूफ मुल्ला, मुख्याध्यापक अजित गोबारे, कविराज रेड्डी, महादेव पंच कमिटीचे अध्यक्ष सखाराम भातागळे यांची प्रमुख उपस्थिती होती. सूत्रसंचालन परमेश्वर सुतार यांनी केले, तर आभार मीनाक्षी हत्ते यांनी मानले. कार्यक्रमासाठी शरणप्पा मलंग विद्यालयाचे शिक्षक राजकुमार जाधव, सतीश कटके, विवेकानंद पाचंगे, बालाजी हिप्परगे, परमेश्वर कोळी, प्रभावती बिराजदार, कलशेट्टी पाटील, दुषंत कांबळे, मोहन साखरे आदींनी परिश्रम घेतले.