शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

शाळेतील शौचालयाची भिंत कोसळून विद्यार्थिनी गंभीर जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 7, 2018 13:20 IST

गंभीर दुखापत झालेल्या या विद्यार्थिनीवर सद्या बार्शी (जि. सोलापूर) येथील खाजगी रूग्णालयात उपचार सुरू आहेत.

कळंब (उस्मानाबाद) - शाळेतील शौचालयाच्या आडोशासाठी उभारण्यात आलेली भिंत कोसळून, त्यातील विट डोक्यात लागल्याने बुधवारी दहिफळ जि.प.प्राथमीक शाळेतील एक विद्यार्थिनी जखमी झाली आहे. गंभीर दुखापत झालेल्या या विद्यार्थिनीवर सद्या बार्शी (जि. सोलापूर) येथील खाजगी रूग्णालयात उपचार सुरू आहेत.

कळंब तालुक्यातील दहिफळ येथे जिल्हा परिषदेची प्राथमिक शाळा आहे.शाळेला काही वर्ग खोल्या नवीन मिळाल्या असल्या तरी त्यालगतच शाळेची जूनी इमारत आहे.नवीन व जूनी अशा दोन्ही इमारती आसपासच आहेत. बुधवारी शाळेत गोवर-रूबेला लसीकरणाचा कार्यक्रम होता.शाळेत याचीच लगबग होती. यादरम्यान शाळेमध्ये इयत्ता तिसरीच्या वर्गात शिक्षण घेणारी स्मिता संदिप घेवारे ही विद्यार्थिनी जुन्या इमारती लगतच्या स्वच्छतागृहाकडे गेली. यावेळी या स्वच्छतागृहास आडोसा म्हणून उभारण्यात आलेली भिंत अचानक कोसळली. 

भिंत कोसळत असतांना लगतच असलेल्या स्मिताच्या डोक्यास एक विट लागली. यात गंभीर इजा झाल्याने शाळेतील शिक्षकांनी स्मिताला प्रथम गावातील प्राथमिक आरोग्य केंद्रात व यानंतर तेथून  उस्मानाबाद येथील जिल्हा रूग्णालयात तात्काळ उपचारार्थ  दाखल केले. दुखापत गंभीर असल्याने स्मिताला तातडीने बार्शी येथील एका खाजगी रूग्णालयात दाखल करण्यात आले. 

दरम्यान, शाळा परिसरातील संपुर्ण जून्या इमारतीचे निर्लेखन करणेचे गरजेचे बनले असतांना आजवर याकडे सर्वांचे दुर्लक्ष झाले आहे.

टॅग्स :Studentविद्यार्थीAccidentअपघातOsmanabadउस्मानाबादzp schoolजिल्हा परिषद शाळा