बलसूर : उमरगा तालुक्यातील गुगळगाववाडी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष अनिरुद्ध बिराजदार यांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी चंद्रकांत कांबळे, मुख्याध्यापक शरण लिंंबाळे, सहशिक्षक चंद्रकांत कांबळे, संभाजी पांचाळ उपस्थित होते.
नंदुराम आश्रमशाळा
बलसूर : उमरगा तालुक्यातील बलसूर येथील नंदुराम प्राथमिक व सखूबाई माध्यमिक आश्रमशाळेत सिंधू बिराजदार व शंकर पवार यांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी मुख्याध्यापक तात्याराव चव्हाण, मोहन राठोड, सहशिक्षक बालाजी शिंदे, राणाप्रताप जाधव, भारत कांबळे, हरी लवटे, मुकेश उपाशे, उद्धव कांबळे, संतोष राठोड, श्रीनिवास साळुंखे, अनिल चव्हाण, शिवराज कांबळे, हनुमंत सुरवसे, विठ्ठल गायकवाड, महादेव पुजारी, रेणुकाबाई कोळी आदींची उपस्थिती होती.
जिल्हा परिषद, उस्मानाबाद
उस्मानाबाद : येथील जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण सार्वजनिक सभागृहात प्रतिमापूजन करण्यात आले. यावेळी अध्यक्षा अस्मिता कांबळे, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. विजयकुमार फड, विजयश्री फड, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. एच.व्ही. वडगावे, जिल्हा सामान्य रुग्णालयातील आयुष विभागाचे डॉ. जी.आर. परळीकर, प्राथमिक शिक्षणाधिकारी डॉ. ए.बी. मोहरे, महिला बाल बालविकासचे जिल्हा कार्यक्रमाधिकारी बी.एच. निपाणीकर, सामान्य प्रशासन विभागातील वरिष्ठ सहायक मधुकर कांबळे, ग्रामीण पाणीपुरवठा विभागाच्या कनिष्ठ भूवैज्ञानिक मेघा शिंदे, आशा कार्यकर्ती गुंजकर, शिक्षणाधिकारी (विस्तार) एस.व्ही. कुंभार आदींची उपस्थिती होती.
शरणप्पा मलंग विद्यालय
उमरगा : येथील कै. शरणप्पा मलंग विद्यालयामध्ये क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी वीरशैव शिक्षण प्रसारक मंडळाच्या सचिव सुरेखाताई मलंग, जिजाऊ ब्रिगेडच्या जिल्हा प्रवक्त्या रेखाताई सूर्यवंशी, स्वयंसिद्ध संस्थेच्या कार्यकर्ती रोहिणी बनसोडे, शोभा तुरोरे, पंचशीला व्हंताळकर, मुख्याध्यापक अजित गोबारे, सुभाष कलापे आदी मान्यवर उपस्थित होते. सूत्रसंचालन शिवानी बिराजदार, दमयंती कलापे यांनी केले, तर आभार परमेश्वर सुतार यांनी मानले. कार्यक्रमासाठी सतीश कटके, विवेकानंद पाचंगे, बालाजी हिप्परगे, परमेश्वर कोळी, प्रभावती बिराजदार, मीनाक्षी हत्ते, कलशेट्टी पाटील, दुष्यंत कांबळे यांनी पुढाकार घेतला.