शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

समर्थला हवीय साथ; बिकट आर्थिक स्थितीमुळे कामगाराच्या मुलाचा मेडिकल प्रवेश अडचणीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2022 18:56 IST

नीट परीक्षेत ६२५ गुण - पुणे येथील ‘बीजेएमसी’ मेडिकल काॅलेजमध्ये प्रवेश निश्चित

उस्मानाबाद - दुकानामध्ये काम करून कुटुंबाचा गाडा हाकणा-या कामगाराच्या मुलाने आपल्या कुटुंबीयांच्या कष्टाचे चिज केले. मेडिकल प्रवेश पात्रतेसाठी देशपातळीवर घेण्यात आलेल्या नीट परीक्षेत ६२५ गुण घेतले. पुणे येथील ‘बीजेएमसी’ मेडिकल काॅलेजमध्ये प्रवेशही निश्चित झाला. हा आनंद समर्थसह त्याचे वडील राजेंद्र पाटील यांच्या चेहऱ्यावर ठळकपणे दिसत हाेता. मात्र, दुसरीकडे ‘एमबीबीएस’ शिक्षणासाठी वर्षाकाठी लागणारे सव्वा ते दीड लाख रुपये आणायचे काेठून? ही विवंचनाही त्यांच्या बाेलण्यातून जाणवत हाेती. पैशांअभावी समर्थचा मेडिकल प्रवेशच अडचणीत सापडला आहे. त्यामुळे समर्थच्या मदतीसाठी आता समाजातील दानशूर व्यक्तींनी पुढे येण्याची गरज आहे.

उस्मानाबाद शहराला लागूनच असलेले खानापूर हे समर्थ राजेंद्र पाटील याचे गाव. प्राथमिक शिक्षण उस्मानाबादेतच झाले. शहरातीलच छत्रपती शिवाजी विद्यालयातून दहावीची परीक्षा दिली. बेताची आर्थिक स्थिती आणि वडिलांच्या कष्टाची जाण असलेल्या समर्थने दहावी परीक्षेत ९७ टक्के गुण घेतले. लातूर येथील शाहू काॅलेजमध्ये त्याचा अकरावीच्या वर्गासाठी प्रवेश निश्चित झाला. आपण दुकानात कामगार असलाे तरी मुलांना दर्जेदार शिक्षण देण्याचा निर्धार राजेंद्र पाटील यांनी केला हाेता. त्यामुळेच त्यांनी आर्थिक स्थितीचा विचार न करता लातूर येथे स्थायिक हाेण्याचा निर्णय घेतला. तिथे गेल्यानंतरही त्यांनी एका ड्रायफ्रुटच्या दुकानात कामगार म्हणून काम सुरू केले.

यातून महिन्याकाठी जेमतेम नऊ ते दहा हजार रुपये हाती पडत हाेते. याच पैशातून कुटुंबाचा गाडा हाकण्यासाेबतच मुलांच्या शिक्षणाचा खर्च ते भागवित. आपले वडील राबराब राबून शिक्षणासाठी पैसे पुरवितात, ही जाण समर्थला हाेती. त्यामुळे त्याने कधीच खासगी क्लासेसचा डाेक्यात विचारही विचारही येऊ दिला नाही. जिद्द आणि चिकाटीच्या बळावर बारावीच्या परीक्षेत ८२ टक्के गुण घेतले. बिकट आर्थिक स्थितीमुळे न डगमगता समर्थने देशपातळीवरील नीट परीक्षेचा अभ्यास सुरू ठेवला. याही परीक्षेत त्याने तब्बल ६२५ गुण घेतले आणि वडिलांचे कष्ट सार्थकी लागले. या गुणांच्या बळावर पुणे येथील ‘बीजेएमसी’ मेडिकल काॅलेजमध्ये त्याचा ‘एमबीबीएस’साठी प्रवेशही निश्चित झाला. मात्र, या शिक्षणासाठी प्रतिवर्ष लागणारे सव्वा ते दीड लाख रुपये आणायचे काेठून, हा प्रश्न कुटुंबीयांसमाेर आहे. त्यामुळे आता समाजातील दानशूर व्यक्तींनी पुढे येण्याची गरज आहे.

समर्थला हवाय मदतीचा हात...आर्थिक परिस्थतीचा बाऊ न करता, जिद्द आणि कष्टाच्या बळावर समर्थ मेडिकल प्रवेश पात्रतेच्या कसाेटीवर खरा उतराला आहे. आता प्रवेशाच्या उंबरठ्यावर असलेल्या समर्थला ‘एमबीबीएस’ अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी प्रतिवर्ष सव्वा ते दीड लाख आवश्यक आहेत. कामगार म्हणून काम करून महिन्याकाठी जेमतेम नऊ-दहा हजार मिळत असल्याने पैशाचा हा डाेंगर कसा पार करायचा, हा माेठा प्रश्न राजेंद्र पाटील यांच्यासमाेर आहे. या स्थितीत त्यांना मदतीची गरज आहे. समर्थचे वडील राजेंद्र पाटील यांनी डाॅ. दत्तात्रय खुने यांची भेट घेऊन आर्थिक विवंचना मांडली. यानंतर त्यांनी थाेडाही विलंब न करता इंडियन मेडिकल असाेसिएशनच्या उस्मानाबाद शाखेशी चर्चा केली. आणि असाेसिएशनच्या प्रत्येकाने मदतीची तयारी दर्शविली. दाेन दिवसांत मदतीचा आकडा सव्वा लाखापर्यंत गेला आहे. ही रक्कम पुरेशी नाही. त्यामुळे समाजातील अन्य दानशूर व्यक्तींनीही पुढे येण्याची गरज आहे.

टॅग्स :doctorडॉक्टरOsmanabadउस्मानाबादStudentविद्यार्थी