शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

जादा दराने बियाणे-खत विक्री, ‘व्हाॅटस्ॲप’द्वारे करा तक्रार; धाराशिवमध्ये १० परवाने निलंबित

By बाबुराव चव्हाण | Updated: June 1, 2023 18:50 IST

शेतकऱ्यांची लुबाडणूक; जादा दराने खताची विक्री, साठाही जुळेना !

धाराशिव - खरीप पेरणीपूर्वीच जिल्ह्यातील काही कृषी दुकानदारांकडून जादा दराने खत शेतकऱ्यांच्या  माथी मारून आर्थिक लुबाडणूक केली जात असल्याचा धक्कादायक प्रकार ‘कृषी’च्या झाडाझडतीतून समाेर आला आहे. अशा १० दुकानदारांना परवाना निलंबनाचा दणका दिला आहे. तर तिघांना ताकीद दिली. जिल्हास्तरावरील तक्रार निवारण कक्ष स्थापन करण्यात आला असून ‘व्हाॅटस्ॲप’द्वारे देखील तक्रार दाखल करता येणार आहे.

खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना निर्धारित दरात खत, बी-बियाणे मिळावे, यासाठी कृषी विभागाकडून जिल्हाभरातील कृषी दुकानांची झाडाझडती सुरू करण्यात आली आहे. या तपासणीत अनेक धक्कादायक बाबी समाेर आल्या आहेत. काही विक्रेत्यांनी निर्धारित किंमतीपेक्षा जादा दराने खत शेतकर्यांच्या माथी मारले आहे. काहींकडील उपलब्ध खत आणि ई-पाॅश मशीनवरील साठा जुळत नाही. तर काहींनी परवान्यात समाविष्ट असलेल्या स्त्राेतांशिवाय इतरांकडून निविष्ठा खरेदी केल्या आहेत. काहींनी तर आपल्याकडे किती खत शिल्लक आहे? ते काेणत्या प्रकारचे आहे? किती विक्री झाले आहे? अशी कुठलीही नाेंद साठा रजिस्टरला केलेली नाही. खत खरेदी केल्यानंतर शेतकर्यांना विहित नमुन्यातील पावत्याही दिल्या नाहीत. हे धक्कादायक प्रकार पाहून आता कृषी विभाग ॲक्शन माेडवर गेला आहे. संबंधित १० विक्रेत्यांविरूद्ध परवाना निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. तर तिघा विक्रेत्यांना सक्त ताकीद दिली आहे. या कारवाईमुळे नियमांना धाब्यावर बसविणारे विक्रेते धास्तावले आहेत.

तुळजापुरात सर्वाधिक गैरप्रकार...कृषी विभागाने कारवाई केलेल्या १० पैकी ५० टक्क्यांहून अधिक म्हणजेच सहा विक्रेते हे एकट्या तुळजापूर तालुक्यातील आहेत. यानंतर भूमचा क्रमांक लागताे. येथील ३ विक्रेत्यांवर बडगा उगारला आहे. तर लाेहार्यातील एका विक्रेत्याचा समावेश आहे. दरम्यान, ताकिद दिलेल्यांत भूममधील दाेन तर उमरग्यातील एकाचा समावेश आहे.

‘व्हाॅटस्ॲप’द्वारे करा तक्रारनिविष्ठा उपलब्धतेच्या व दराच्या अनुषंगाने तक्रारीचे निराकरण करण्यासाठी जिल्हा व तालुकास्तरावर तक्रार निवारण कक्षाची स्थापना करण्यात आली आहे. जिल्हास्तरावरील तक्रार निवारण कक्षाचा संपर्क क्रमांक ०२४७२-२२२३७९४ असा असून यावर ‘व्हाॅटस्ॲप’द्वारे देखील तक्रार स्विकारली जाणार आहे.-रवींद्र माने, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी.

टॅग्स :Osmanabadउस्मानाबादagricultureशेतीFarmerशेतकरी