शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

डोंजा गावक-यांची सचिन तेंडुलकरला बॉलिंग, पण एकही चेंडू बॅटला नाही लागला   

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 19, 2017 16:34 IST

सांसद आदर्श ग्राम योजनेत दत्तक घेतलेल्या परंडा तालुक्यातील डोंजा गावाला मास्टर ब्लास्टर आणि खासदार सचिन तेंडुलकरने मंगळवारी भेट दिली

उस्मानाबाद - सांसद आदर्श ग्राम योजनेत दत्तक घेतलेल्या परंडा तालुक्यातील डोंजा गावाला मास्टर ब्लास्टर आणि खासदार सचिन तेंडुलकरने मंगळवारी भेट दिली. यावेळी सचिनने गावातील जिल्हा परिषद शाळेच्या मैदानावर विद्यार्थ्यांसोबत क्रिकेटचा आनंद घेतला. खुद्द सचिन तेंडुलकरसोबत क्रिकेट खेळायला मिळत असल्याने मुलं आणि गावकरी चांगलेच आनंदात होते. सचिनला बॉलिंगही करण्यात आली. पण आनंदाच्या भरात गावक-यांनी सगळे बॉल वाईड टाकले त्यामुळे एकही बॉल सचिनच्या बॅटला लागला नाही. पण सचिनसोबत खेळण्याचा आनंद मात्र सगळ्यांनी लुटला.

गावात दाखल होताच ग्रामस्थांकडून झालेल्या जंगी स्वागतानंतर सचिनने पहिल्यांदा येथील जिल्हा परिषद शाळेस भेट देऊन बांधकामाची पाहणी केली. त्यानंतर क्रिकेटच्या मैदानावर जाऊन विद्यार्थ्यांसोबत क्रिकेट खेळण्याचा आनंद लुटला. मात्र, सचिनच्या चाहत्यांनी मैदान गच्च भरले होते. अगदी पिचभोवतीही गराडा पडल्याने सचिनला मनसोक्त टोलेबाजी करता आली नाही. त्याने विद्यार्थ्यांनी केलेल्या गोलंदाजीवर ‘डिफेन्स’चे कौशल्य सादर केले

यानंतर शाळेच्या बंद खोलीत काही मोजक्या विद्यार्थ्यांसोबत त्याने संवाद साधून खेळाइतकेच शिक्षणही महत्वाचे सांगितले व विद्यार्थ्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. शाळेच्या बांधकामासोबतच सचिन गावातील विविध विकासकामांची पाहणी पायी फिरुन करणार आहे. तसेच ग्रामस्थांशी संवादही साधणार आहे.

सचिनच्या स्वागतासाठी उभारल्या गुढी प्रत्येक घरावर गुढी उभारण्यात आली असून, दारात रांगोळ्या सजल्या आहेत. गावच्या वेशीतच भव्य अशी कमान लक्ष वेधत आहे. गावातील अबाल-वृद्ध सचिनची आतुरतेने वाट पाहत होती.

खासदार आदर्श गाव योजनेअंतर्गत मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने आंध्र प्रदेशमधील पुट्टमराजू कन्ड्रिगा गावाचा कायापालट केला. त्यानंतर गेल्या वर्षी सचिनने महाराष्ट्राच्या उस्मानाबाद जिल्ह्यातील डोंजा गाव दत्तक घेतलं.

 

टॅग्स :Sachin Tendulkarसचिन तेंडुलकर