औसा येथील बस चालक ज्ञानोबा परिहार यांनी बस. क्र. एमएच. २५ बीएल १२३७ निष्काळजीपणे चालवून नळदुर्ग शिवारात ॲटोरिक्षास पाठीमागून जोराची धडक दिली. या अपघातात तुळजापूर तालुक्यातद अणदूर येथील रिक्षा चालक सिध्दाप्पा क्षिरसागर यांचा गंभीर जखमी होऊन मृत्यू झाला. मयताचे वडील सुभाष क्षीरसागर यांच्या फिर्यादीवरुन संबंधिताविरुध्द नळदुर्ग पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला.
लोहारा बसस्थानकातून वाँटेड जेरबंद
उस्मानाबाद : आनंदनगर पोलिसांस लोहारा येथील आरोपी अनिल महावीर देशमाने हा पाहिजे होता. मात्र, तो पोलिसांस गुंगारा देत होता. १२ जानेवारी तो लोहाऱ्यात असल्याची माहिती खबऱ्यामार्फत स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकास प्राप्त झाली. या माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने लोहारा बसस्थानकातून अनिल देमशाने यास ताब्यात घेऊन पुढील तपासासाठी आनंदनगर पाेलिसांच्या स्वाधीन केले.
४१३ वाहनचालकांविरुध्द दंडात्मक कारवाया
उस्मानाबाद : वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांविरुध्द जिल्ह्यातील १८ पोलीस ठाणी व वाहतूक शाखेच्या वतीने धडक मोहीम राबविण्यात येत आहे. सोमवारी जिल्ह्यातील विविध मार्गावर वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या ४१३ वाहनचालकांवर कारवाईचा बडगा उगारुन त्यांच्याकडून ९४ हजार १०० रुपयांचे तडजोड शुल्क वसूल करण्यात आले. नियम मोडणाऱ्या वाहनचालकांवर यापुढेही कारवाया केल्या जाणार असल्याचे जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयातून कळविले आहे.
दारु अड्ड्यावर धाड एकाविरुध्द गुन्हा
उस्मानाबाद : उस्मानाबाद ग्रामीण पोलीस ठाण्याच्या पथकाने येडशी येथील अवैध दारु अड्ड्यावर ११ जानेवारी रोजी धाड टाकली. यात येडशी येथील महादेव पवार याच्याजवळ १० लिटर अवैध गावठी दारु आढळून आली. पोलिसांनी मद्य जप्त करुन संबंधिताविरुध्द गुन्हा नोंदविला आहे.
संगीत बंद केल्याने एकास मारहाण
उस्मानाबाद : मोठ्या आवाजातील संगीत बंद केल्याच्या कारणावरुन एकास चौघांनी बेदम मारहाण केली. ही घटना उस्मानाबाद शहरात १० जानेवारी रोजी घडली. येथील समर्थ नगर भागातील रविंद्र कदम यांनी गल्लीत मोठ्या आवाजात सुुरु असलेल्या संगीत यंत्रणेचे बटण बंद केले. यावर चिडून गल्लीतीलच वैभव व संकेत भागवत काकडे व अन्य दोन अनोळखी व्यक्तींनी दगड मारुन जखमी केले. तसेच, जिवे मारण्याची धमकी दिली, अशी फिर्याद कदम यांनी आनंदनगर पोलीस ठाण्यात दिली. यावरुन उपरोक्त चौघांविरुध्द गुन्हा नाेंद झाला.