प्रारंभी श्री तुळजाभवानी प्रतिमा पूजन व दीपप्रज्वलन जिल्हा संस्कार भारतीचे श्यामसुंदर भन्साळी, प्रभाकर चोराखळीकर, कोषप्रमुख अरविंद पाटील, अविनाश धट यांच्या हस्ते करण्यात आले. डॉ. सतीश महामुनी यांच्या प्रास्ताविक भाषणानंतर वैराग येथील शिल्पकार सुहास सुतार यांनी मातीपासून श्रीगणेशमूर्ती साकारण्याचे प्रात्यक्षिक दिले. त्यानंतर उपस्थित स्पर्धकांनी गणेश मुर्ती साकारल्या. या स्पर्धेत मृणाल मारुती पारवे, सिद्धी सतीश चव्हाण, अंकिता प्रमोद क्षीरसागर यांनी अनुक्रमे प्रथम, द्वितीय व तृतीय, तर माहेश्वरी शेटे, श्रीराम रणदिवे, शांभवी साखरे, विनायक चव्हाण, सई गंगणे यांना उत्तेजनार्थ पारितोषिक सिने अभिनेते शंतनू गंगणे, आयोजक सचिन घोडके, स्पर्धा प्रमुख डॉ. सतीश महामुनी, जिल्हाप्रमुख शेषनाथ वाघ, चित्रकार दिग्विजय कुंभार, गणेश जळके, ज्येष्ठ कलाशिक्षक भीमाशंकर इंगळे, महामंत्री सुधीर कुलकर्णी यांच्या हस्ते देण्यात आले. मूर्तीचे परीक्षण पद्माकर मोकाशे, दत्तात्रय मुसळे, नंदकुमार पोतदार यांनी केले.
इको फ्रेंडली गणपती कार्यशाळेस प्रतिसाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2021 04:33 IST