अणदूर : बहुजन रयत परिषदेच्या प्रदेश कार्याध्यक्षपदी उद्योजक रमेश गालफाडे यांची निवड झाल्याबद्दल इटकळ, बाभळगाव ग्रामस्थांच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी सरचिटणीस ईश्वर क्षिरसागर, मीडिया सेलचे अध्यक्ष प्रकाश गायकवाड, माजी सरपंच विजयकुमार गायकवाड, माजी सरपंच अझर मुजावर, आशपाक मुजावर, दिनेश सलगरे, नामदेव गायकवाड, दत्तात्रय गायकवाड, कमलाकर रणदिवे, सुनिल क्षीरसागर, विलास काळुंके, पुष्पक कसबे, दिगंबर लोंढे, तानाजी बनसोडे यांची प्रमुख उपस्थिती होती. याच कार्यक्रमात हिप्परगा ताड येथील मातंग समाज बांधवांसाठी दोन हजार लिटर क्षमतेची पिण्याच्या पाण्याची टाकी तसेच बाभळगाव येथील मातंग समाजाच्या स्मशानभूमी संरक्षक भिंतीसाठी आर्थिक मदत देण्यात आली.
(फोटो)
इटकळ ग्रामस्थांच्या वतीने रमेश गालफाडे यांचा सत्कार करताना विजयकुमार गायकवाड, अझर मुजावर, दिनेश सलगरे, आशपाक मुजावर, नामदेव गायकवाड आदी.