शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

भूम तालुक्यात चोरट्यांनी पळविला पावणेपाच लाखाचा मुद्देमाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 13, 2018 19:28 IST

चोरट्यांनी घरफोडी करून रोख रक्कम, सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह पावणे पाच लाखाचा मुद्देमाल लंपास केला़

भूम (उस्मानाबाद ) : चोरट्यांनी घरफोडी करून रोख रक्कम, सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह पावणे पाच लाखाचा मुद्देमाल लंपास केला़ ही घटना भूम तालुक्यातील हिवरा येथे शनिवारी पहाटेच्या सुमारास घडली़

तालुक्यातील हिवरा येथील शेतकरी दशरथ रुद्राप्पा सावंत यांचे भूम - उस्मानाबाद रोडवर घर आहे़ शनिवारी पहाटेच्या सुमारास चोरट्यांनी घराचे मुख्य गेटचे कुलूप तोडून आतमध्ये प्रवेश केला़ घरातील पत्राच्या पेटीमध्ये ठेवलेले रोख १ लाख ८० हजार रुपये, ७० हजार रूपये किंमतीच्या पाच ग्रॅमच्या सोन्याच्या सात अंगठ्या, एक लाख रूपये किंमतीचे ५० ग्रॅम सोन्याचे गोप, ५० हजार रूपये किंमतीचे २५ ग्रॅम वजनाचे ब्रासलेट, २० हजार रूपये किंमतीचे १० ग्रॅम सोन्याची बोरमाळ, २० हजार रूपये किंमतीचे सात ग्रॅम सोन्याचे झुंबर, ३ ग्रॅम वजनाचे कानातील झुमके, ९ ग्रॅम वजनाचे गंठण, ५ ग्रॅमचे गंठण असा एकूण ४ लाख ७८ हजार हजार रुपयाचा माल चोरट्यांनी पळवला.

दशरथ सावंत यांनी दिलेल्या फिर्यादीवरून भूम पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. तपास पोनि माधव सुर्यवंशी हे करत आहेत. दरम्यान, घटनेनंतर पोलिसांनी श्वान पथकाला पाचरण केले होते़ श्वान पथकाने घटना स्थळापासून जवळ असलेल्या बांधापर्यंत माग काढला़ त्यानंतर श्वान तेथेच घुटमळले़ तज्ज्ञांनी घटनास्थळावरील ठसे घेतले आहेत़ चोरांच्या शोधार्थ पथक पाठविल्याचे पोलिसांनी सांगितले़

भारनियमनाचा फटकाहिवरा गावात रात्रीचे भारनियमन सुरू आहे़ शेतकरी दशरथ सावंत यांच्या पत्नी रात्री १२ वाजण्याच्या  सुमारास दळण आणण्यासाठी गेल्या होत्या़ पडलेला अंधार आणि घरी कोणी नसल्याची संधी साधत चोरट्यांनी सावंत यांच्या घरातील मुद्देमाल लंपास केला़ सावंत यांच्या पत्नी घरी आल्यानंतर ही घटना समोर आली़

टॅग्स :RobberyचोरीOsmanabadउस्मानाबादCrime Newsगुन्हेगारी