शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
3
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
4
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
5
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
6
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
7
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
8
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
9
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
10
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
11
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
12
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
13
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
14
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
15
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
16
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
17
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
18
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
19
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
20
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

महात्मा फुले यांचे आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्मारक उभारा; उस्मानाबादेत सावता परिषदेची मागणी 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 28, 2018 18:02 IST

क्रांतीसूर्य महात्मा फुले यांचे आंतरराष्ट्रीय स्मारक उभारण्यात यावे, या मागणीसाठी मागील काही वर्षांपासून शासनाकडे पाठपुरावा सुरू आहे.

उस्मानाबाद : क्रांतीसूर्य महात्मा ज्योतीराव फुले यांचे आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्मारक उभारण्यात यावे, ‘ओबीसी’चे आरक्षण अबाधित ठेऊन मराठा समाजाला आरक्षण देण्यात यावे आदी मागण्यांसाठी सावता परिषदेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आज धरणे आंदोलन करण्यात आले.

क्रांतीसूर्य महात्मा फुले यांचे आंतरराष्ट्रीय स्मारक उभारण्यात यावे, या मागणीसाठी मागील काही वर्षांपासून शासनाकडे पाठपुरावा सुरू आहे. परंतु, शासन सदरील मागणीच्या अनुषंगाने गांभीर्याने विचार करीत नाही. त्यामुळे हा प्रश्न आजही प्रलंबित आहे. सदरील मागणी तातडीने निकाली काढण्यासोबतच महिला व बहुजन शिक्षणाचे पुरस्कर्ते महात्मा ज्योतीरा फुले यांच्या जयंतीदिनी शिक्षक दिन म्हणून पाळण्यात यावा, ओबीसी वित्त व विकास महामंडळास ५०० कोटीची भरीव तरतूद करण्यात यावी आदी मागण्यांसाठी सावता परिषदेच्या वतीने  जिल्हाध्यक्ष सोमनाथ माळी यांच्या नेतृत्वाखाली आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. 

आंदोलनामध्ये डॉ. सुरेश माळी, सतीश फुटाने, विवेक मुळे, सुनिल माळी, महादेव माळी, शिवाजी व्यवहारे, बापू शिंदे, दिलीप माळी आदींनी सहभाग नोंदविला. दरम्यान, जिल्हा परिषद अध्यक्ष नेताजी पाटील, राष्ट्रवादी सदस्य महेंद्र धुरगुडे, अ‍ॅड. दत्तात्रय देवळकर यांनी आंदोलनस्थळी जावून आंदोलनास पाठींबा दर्शविला.

या आहेत प्रमुख मागण्या...- जातीनिहाय जनगणना करून आकडेवारी जाहीर करावी.- क्रांतीसूर्य महात्मा ज्योतीराव फुले व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचा भरतरत्न पुरस्काराने सन्मान करावा.- पुणे येथील भीडेवाड्यास राष्ट्रीय स्मारक म्हणून घोषित करावे.- ओबीसी मंत्रालयामार्फत ओबीसीतील शेतकरी, कामगार, महिला, विद्यार्थी व युवक यांच्यासाठी योजना तयार कराव्यात.- ओबीसी विद्यार्थ्यांसाठीची व्यावसाय अभ्यासक्रमाची बंद करण्यात आलेली शिष्यवृत्ती पूर्ववत सुरू करावी.- स्थगित करण्यात आलेली नोकर भरती तातडीने करावी.

टॅग्स :agitationआंदोलनOsmanabadउस्मानाबादOBCअन्य मागासवर्गीय जातीState Governmentराज्य सरकार