शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधींचा दावा फॅक्ट चेकमध्ये निघाला खरा, एकच व्यक्ती ४ ठिकाणी मतदार, नंबर सारखाच
2
ओबीसी क्रिमिलेअर उत्पन्न मर्यादेचा, दर ३ वर्षांनी आढावा घ्या; इतर मागासवर्गीयांसाठी नियुक्त समितीची शिफारस
3
जिथे-जिथे नवीन मतदार तिथे-तिथे भाजपचा विजय! राहुल गांधी यांची टीका; प्रियांका गांधी म्हणाल्या...
4
रागाने गेलेला मुलगा आठ वर्षांनी परतला, पोलिसांकडून ‘सरप्राईज गिफ्ट’; आई-वडिलांचे डोळे अश्रूंनी डबडबले 
5
अमेरिकेकडून शस्त्रास्त्रं खरेदी थांबविल्याच्या वृत्ताचे भारताकडून जोरदार खंडन; संरक्षण मंत्रालयानं स्पष्टच सांगितलं 
6
८० एकरांत २५ फूट गाळ, अजूनही दबलेत १५० जण; आधुनिक मशिन धरालीत येण्यास लागणार ४ दिवस
7
निवडणूक आयोग शपथपत्र द्यायला सांगतोय; पण मी आधीच संसदेत शपथ घेतली आहे : राहुल गांधी
8
महादेवी हत्तीणीसाठी सोमवारी सर्वाेच्च न्यायालयाला साकडे, राज्य सरकार, वनतारा, नांदणी मठ देणार एकत्रित विनंतीअर्ज
9
इंडिया आघाडीच्या बैठकीत उद्धव ठाकरे शेवटच्या रांगेत; शिंदेसेनेचे आंदोलन, तर भाजपची टीका
10
एकाच वेळी चार विद्यार्थ्यांची अंत्ययात्रा, हमसून-हमसून धाय मोकलून रडले गाव...
11
पडळकर समर्थकाचे अपहरण, पाच तासांत आरोपी ताब्यात; रोहित पवार मास्टरमाइंड असल्याचा आरोप
12
"पुणे तर ‘फ्युचर सिटी’; १० वर्षांत कायापालट; शहरासाठी आणखी पाच पोलिस ठाणी" 
13
कावडयात्रेत घुसला भरधाव ट्रक; दोन शिवभक्तांचा मृत्यू
14
उद्योगांची एक्स्प्रेस सुस्साट, प्रक्रिया सुलभ आणि वेगवान; गुंतवणूकदारांना मोठा दिलासा
15
ठाण्यात कैद्यांच्या बंदोबस्तामध्ये हलगर्जीपणा, नऊ पोलिस कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई
16
महादेवीसाठी महाराष्ट्रात तोडीच्या सुविधा नाहीत; पेटाच्या नव्या भूमिकेवर मठाचे स्पष्टीकरण
17
जोपर्यंत टॅरिफचा प्रश्न सुटत नाही, तोपर्यंत भारतासोबत व्यापार चर्चा होणार नाही - ट्रम्प
18
'भारत आता कुणासमोरही झुकणार नाही', 'ट्रम्प टॅरिफ बॉम्ब'वर केंद्रीय मंत्री पीयुष गोयल काय बोलले?
19
'कुठून मी या पुण्याचा पालकमंत्री झालो, जो तो उठतो अन्...'; अजित पवारांनी जोडले हात, असं काय घडलं?
20
'एकाच घराच्या पत्त्यावर 80 मतदार आहेत, कारण..."; राहुल गांधींचा आरोप, बूथ लेव्हल ऑफिसरने केला खुलासा 

शेतीचे गुणगान करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करा; शेषराव मोहिते यांचे परखड मत

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 13, 2020 03:01 IST

कुंपणाबाहेर पडा : आता आसूड ओढणारी पोरं आपलीच

चेतन धनुरेउस्मानाबाद : सद्य:स्थितीत शेतकऱ्यांवर आसूड ओढणाºया यंत्रणेतील पोरंही शेतकºयाचीच आहेत़ साहित्यातही शेतीचे गोडवे गाण्याचे दिवस राहिले नाहीत़ उलट असे गुणगान करून आभासी चित्र निर्माण करणाºयांवर गुन्हे दाखल करावेत. शेतकºयांपुढे शेतीच्या कुंपणाबाहेर पडणे, हाच एक मार्ग उरल्याचे परखड मत डॉ़ शेषराव मोहिते यांनी येथे व्यक्त केले़

अ.भा. मराठी साहित्य संमेलनात रविवारी ‘शेतकºयाचा आसूड : आजच्या संदर्भात’ या विषयावर परिचर्चा झाली़ अध्यक्षस्थानी डॉ़ शेषराव मोहिते होते़ तर डॉ़ रविंद्र शोभणे, विजय चोरमारे, डॉ़ कैलास दौंड, गुरय्या स्वामी यांचा सहभाग होता़ अध्यक्षस्थानावरुन डॉ़मोहिते यांनी शेतकºयांना नागविणाºया राज्यकर्ते, प्रशासनावर शाब्दिक आसूड ओढले़ ते म्हणाले, शेतकरी पिढ्यान्पिढ्या कर्जबाजारी करण्याची व्यवस्था राज्यकर्त्यांनी निर्माण केली. निवडणुका आल्या की कर्जमाफीच्या लोकप्रिय घोषणा केल्या जातात. दुष्काळ पडल्यावर कधी आपण एखादा व्यापारी, नोकरदार खडी फोडायला गेलेला पाहिलाय का? केवळ शेतकºयालाच अशी झळ बसते़ त्यामुळे शेतकºयांना आता शेतीचे कुंपण तोडून बाहेर पडण्याशिवाय गत्यंतर नसल्याचे मतही डॉ़ मोहिते यांनी व्यक्त केले़क्रांतिकारी चळवळ व्हावी...विजय चोरमारे म्हणाले, महात्मा फुले यांनी शेतकºयांच्या आसूडमध्ये १३६ वर्षांपूर्वी वर्णिलेली परिस्थिती आजही तशीच आहे़ शेतकºयांच्या प्रश्नांना समजून घेण्यात समाज आणि राज्यकर्ते कमी पडले. शेतकºयांसाठी क्रांतिकारी चळवळ उभी व्हावी लागेल, असेही ते म्हणाले.शेतीचे शिक्षण बांधावर पोहोचले पाहिजेकैैलास दौंड मांडणी करताना म्हणाले, महात्मा फुले यांनी शेतकºयांच्या आसूडमध्ये शेती शिक्षणाचा विचार मांडला होता़ तो कृषी विद्यापीठे, महाविद्यालयांच्या माध्यमातून प्रत्यक्षात आला़ मात्र, यात शिक्षण घेणारी शेतकºयांची मुलं नोकºयांच्या मागे धावत आहेत़ त्यामुळे शेती शिक्षण हे बांधावर पोहोचलेच नाही़ त्यासाठी शेतकºयांच्या पोरांनी ‘आसूड’ वाचावा.कृषिमंत्री ‘शेतकºयांचा आसूड’ वाचलेला हवारवींद्र शोभणे म्हणाले, शेतकºयांच्या श्रमशक्तीचा मोबदला मिळत नाही़ याला निसर्गासोबतच राज्यकर्तेही जबाबदार आहेत़ त्यामुळे राज्यकर्त्यांनी ‘शेतकºयांचा आसूड’ वाचलेलाच व्यक्ती कृषिमंत्री निवडावा. शेतकºयांनीही देवभोळेपणा सोडून वास्तववादी दृष्टिकोन स्वीकारावा, असेही ते म्हणाले.राज्यकर्त्यांनी ‘काम की बात’ करावीगुरय्या स्वामी म्हणाले, राज्यकर्त्यांनी ‘मन की बात’ करण्याऐवजी ‘काम की बात’ केली तर शेतकºयांच्या वेदनेवर मात्रा मिळेल़ शेतकºयास केवळ पीककर्ज न देता मशागतीसही अल्प व्याजदरात कर्ज द्यावे, जमीन अधिग्रहण कायदा रद्द करावा, असे मार्गही स्वामी यांनी सुचविले़

टॅग्स :Farmerशेतकरीagricultureशेती