शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

हजारो भाविकांच्या उपस्थितीत तुळजाभवानी मंदिरात अजाबळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 18, 2018 17:09 IST

तुतारी, संबळ, हलगी, बॅन्ड व नगाराच्या निनादात व आई राजा उदो उदोच्या जयघोषात हजारो देवी भक्तांच्या उपस्थितीत तुळजाभवानी मंदिरातील प्रज्वलीत होमयज्ञावर पारंपरिक पद्धतीने आज अजाबळी हा धार्मिक विधी भक्तीमय वातावरणात पार पडला.

तुळजापूर (उस्मानाबाद ) : तुतारी, संबळ, हलगी, बॅन्ड व नगाराच्या निनादात व आई राजा उदो उदोच्या जयघोषात हजारो देवी भक्तांच्या उपस्थितीत तुळजाभवानी मंदिरातील प्रज्वलीत होमयज्ञावर पारंपरिक पद्धतीने आज अजाबळी हा धार्मिक विधी भक्तीमय वातावरणात पार पडला.

महानवमी नवरात्रातील शेवटच्या माळेनिमित्त तुळजाभवानी मंदिरात चाललेल्या नवरात्रातील विविध धार्मिक उपक्रमाची दुपारी झालेल्या घटोत्थोपणाने सांगता झाली. तत्पूर्वी रात्री दीड वाजता दैनंदिन चरणतीर्थ विधी पार पडल्यानंतर भाविकांना देवी दर्शनासाठी सोडण्यात आले. यानंतर पहाटे पाचच्या सुमारास अभिषेक घाट होऊन पंचामृत अभिषेकास प्रारंभ झाला. नऊ वाजता अभिषेक संपून महंत व भोपे पुजाऱ्यांनी तुळजाभवानीची विशेष अलंकार महापूजा मांडली.

यानंतर पंचखाद्य नैवेद्य दाखवून भोपे पुजारी आकाश पाटील व संस्थानचे अध्यक्ष राधाकृष्ण गमे यांनी श्री तुळजाभवानी ची धुपारती केली. अंगारा विधी पार पडल्यानंतर सिंदफळ येथून आणलेल्या आजबळीचे विधीवत पूजन करून सवाद्य होमयज्ञावर आणण्यात आले. या ठिकाणी महसूल कर्मचारी जीवन वाघमारे यांनी पारंपरिक पद्धतीने अजाबळीचा धार्मिक विधी पार पाडला. त्यानंतर श्री तुळजाभवानीच्या चरणी रक्त तिलक लावला. सिंह गाभाऱ्यात बसविण्यात आलेले घट भोपे पुजारी पाटील  व अध्यक्ष गमे यांच्या हस्ते उठविण्यात आले.

या घटोत्थोपणानंतर सवाद्यात व संबळाच्या निनादात उपदेवता त्रिशूल व मातंगी देवी या ठिकाणची घट उठविण्यात आले. त्यानंतर गोमुखातील शिवकाशी व कल्लोळातील महादेवाचे दर्शन घेण्यात आले. या ओला अंगारा विधीनंतर जिल्हाधिकारी राधाकृष्ण गमे यांच्या हस्ते अजाबळीचे मानकरी गणपत लांडगे व जीवन वाघमारे यांचा फेटा बांधून भर पेहराव आहेर देऊन सत्कार करण्यात आला.

याप्रसंगी अतिरिक्त जिल्हाधिकारी पराग सोमण, तहसीलदार योगिता कोल्हे, चारही महंत, सिद्ध शवर इंतुले, भोपी मंडळाचे अमर राजे परमेश्वर सचिन पाटील ,संजय सोनजी, दिनेश परमेश्वर, पुजारी मंडळाचे सज्जनराव साळुंखे, बिपीन शिंदे, सुधीर रोचकरी, अविनाश गंगणे, उपाध्ये मंडळाचे नागेश बुवा अंबुलगे, विशाल कोंडो, मकरंद प्रयाग, सेवेकरी दयानंद आवटी, संभाजी पलंगे, मधुकर चोपदार, गौतम पवेकर, दुर्गेश छत्रे, गोंधळी अनंत रसाळ, राजेंद्र गायकवाड यांच्यासह भाविक उपस्थित होते.

टॅग्स :Osmanabadउस्मानाबादNavratriनवरात्रीspiritualअध्यात्मिक