पेठसांगवी : जागतिक पर्यावरणदिनानिमित्त येथील उद्योजक महेश देशमुख यांनी गावात तीनशे वृक्षरोपांचे वाटप केले केले. या झाडांची गावातील मंदिर, हनुमान मंदिर, विठ्ठल-रुक्मिणी मंदिर, शांतेश्वर मंदिर, खंडोबा मंदिर, लक्ष्मी मंदिर, इमामसाहेब दर्गा व मुस्लिम वस्तीतील मस्जिदसमोर, अण्णाभाऊ साठे समाजमंदिर, डॉ.बाबासाहेब आंबेडकर भवन समोर, संत रोहिदास महाराज नियोजित जागेत लावण्यात आली. यावेळी माजी सरपंच सदानंद बिराजदार, पं. स. सदस्य बसवराज शिंदे, तंटामुक्ती समिती अध्यक्ष दत्तू राऊत, ग्रामपंचायत सदस्य संजय माळी, पोलीस पाटील ईश्वर सुरवसे, माजी सरपंच राजेंद्र सुरवसे, माजी तंटामुक्ती अध्यक्ष गंगाराम माळी, संजय दलाल, माजी सरपंच सिद्धाप्पा महाजन, महादेव माळी, महादेव घोडके, ज्ञानराज देशमुख, विजयकुमार देशमुख, गोरक बनसोडे, दयानंद बनसोडे, रमेश पंचमहाल, माेहद्दीन शेख, अहमद तांबोळी, संतोष बिराजदार आदी उपस्थित होते. दरम्यान, देशमुख यांनी कोरोनाकाळात पारनेर (जि. अहमदनगर) येथील नीलेश लंके प्रतिष्ठानच्या कोविड सेंटरलादेखील रोख रक्कम तसेच अन्नधान्याची मदत दिली. उमरगा येथील ईदगाह कोविड सेंटरला भेट देऊन येथेही आर्थिक हातभार लावला आहे.
पेठसांगवीत तीनशे वृक्ष रोपांची लागवड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2021 04:22 IST